नागपुरात परिचारिका संघटनेचा संपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:28 AM2020-08-19T01:28:24+5:302020-08-20T19:41:06+5:30
कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या पत्रकात म्हटले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या पत्रकात म्हटले आहे, परिचारिकांच्या मागण्यांकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करीत आले आहे. या मागण्यांकडे आता लक्ष वेधण्यासाठी १ ते ७ सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती बांधून परिचारिका सेवा देतील. त्यानंतरही मागण्यांवर विचार न झाल्यास ८ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला जाईल. मागण्यांमध्ये रुग्णालयातील परिचारिकांच्या रिक्त जागा भरण्याची मुख्य मागणी आहे. सोबतच सात दिवस रोटेशन व सात दिवस क्वारंटाईनचा नियम पाळावा, सकस आहार व राहण्याची चांगली सोय करण्यात यावी, राज्यातील परिचारिकांना केवळ रुग्णसंबंधीची कामे द्यावीत, केंद्र शासनाप्रमाणे जोखमीचा भत्ता देण्यात यावा, ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे येथील अधिपरिचारिकाचे निलंबन रद्द करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.