नागपुरात बैलाच्या हल्ल्यात वृद्धाचा बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:58 PM2018-02-13T23:58:24+5:302018-02-14T00:01:36+5:30
कॉटन मार्केट चौक येथील शंकर विलास भोजनालयासमोर मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास जयश्री टॉकीज परिसरातील रहिवासी मुरलीधर आबाजी दातारकर (५८) यांच्यावर बैलाने हल्ला चढविला. त्यांना धडक देऊ न खाली पाडले तसेच पायांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात दातारकर गंभीर जखमी झाले. उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉटन मार्केट चौक येथील शंकर विलास भोजनालयासमोर मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास जयश्री टॉकीज परिसरातील रहिवासी मुरलीधर आबाजी दातारकर (५८) यांच्यावर बैलाने हल्ला चढविला. त्यांना धडक
देऊ न खाली पाडले तसेच पायांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात दातारकर गंभीर जखमी झाले. उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मुरलीधर दातारकर यांच्यावर बैल हल्ला करीत असताना या मार्गावर वर्दळ होती. परंतु बैलाच्या भीतीमुळे कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. एका ओळखीच्या महिलेने दातारकर यांच्या कुु टुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय लगेच घटनास्थळी पोहचले. जखमी अवस्थेतील दाताकर यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मेयो पोलीस चौकीने गणेशपेठ पोलिसांना याची सूचना दिली. तसेच महापालिकेलाही या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कोंडवाडा विभागाच्या पथकाने बैलाला पकडून कोंडवाड्यात टाकले.
कॉटन मार्केट परिसरात मोकाट जनावरांची दहशत आहे. रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्यांवर ते हल्ला चढवितात. जनावरांमुळे वाहनांचे अपघात घडतात. जनावरे मोकाट सोडणाऱ्या गोपालकांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेकदा पोलीस विभाग व महापालिका यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. शहर पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी मोकाट जनावरे सोडणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी अद्याप एकाही गोपालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान नागरिकांनी मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.