Nagpur: १२ वी व १० वी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

By आनंद डेकाटे | Published: July 4, 2024 07:18 PM2024-07-04T19:18:30+5:302024-07-04T19:20:07+5:30

Nagpur News: दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र ४ जुलै पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संदर्भात तांत्रिक अडचणी उद्भवल्यास माध्यमिक शाळा तसेच कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी कळविले आहे.

Nagpur: Online admit card for 12th and 10th supplementary exam available | Nagpur: १२ वी व १० वी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

Nagpur: १२ वी व १० वी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

- आनंद डेकाटे  
नागपूर -  दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र ४ जुलै पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संदर्भात तांत्रिक अडचणी उद्भवल्यास माध्यमिक शाळा तसेच कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी कळविले आहे.

सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ट महाविद्यालयांना जुलै-ऑगष्ट २०२४ च्या १०वी, १२वी परिक्षेची प्रवेशपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ४ जुलै २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. School/College login मध्ये डाऊनलोड करण्याकरिता ही प्रवेशपत्र उपलब्ध झाली आहे. जुलै ऑगष्ट २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयांनी १०वी, १२वी परिक्षेची प्रवेशपत्रे प्रिंट करुन घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

ऑनालाईन प्रवेशपत्राची प्रिंट घेण्यास कोणतेही शुल्क पडणार नाही, या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी घेता येणार आहे, विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा, कनिष्ट महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा द्यावा, फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावी, आदी सूचना मंडळातर्फे करण्यात आल्या आहेत.

Web Title: Nagpur: Online admit card for 12th and 10th supplementary exam available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.