Nagpur: जनतेने घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात मुबलक पेट्रोल व गॅस साठा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 2, 2024 08:02 PM2024-01-02T20:02:52+5:302024-01-02T20:03:36+5:30

Nagpur: नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे.

Nagpur: People should not panic, the district has abundant petrol and gas reserves, informed the district collector | Nagpur: जनतेने घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात मुबलक पेट्रोल व गॅस साठा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Nagpur: जनतेने घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात मुबलक पेट्रोल व गॅस साठा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

- माेरेश्वर मानापुरे
नागपूर -  नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी केले. 

जिल्ह्यात सोमवारपासून ट्रक व ट्रँकरचालकांनी काही ठिकाणी रस्तारोको आंदोलन केल्यामुळे इंधन टंचाईची अफवा पसरली आहे. शहरात पंपावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल व गॅस डिलर असोशिएशनचे नागपूर जिल्ह्याच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.

संपाला आमचा पाठिंबा नसल्याचे पेट्रोल डिझल आणि गॅस डिलर असोशिएशनने बैठकीत सांगितले. स्वत:च्या टँकरने पुरवठा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. जिल्हा प्रशासनाकडे पोलीस संरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतून जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी चर्चा करून टँकरधारकांना पोलीस संरक्षणाची हमी दिली. याशिवाय नागपूर पोलीस आयुक्तांशीदेखील परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यांनी माध्यमांसाठी एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये जिल्ह्यात कुठेही पेट्रोल डिझेल व गॅसची टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत गोंधळून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक असेल, गरज नसेल तर पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, असे आवाहन केले.

Web Title: Nagpur: People should not panic, the district has abundant petrol and gas reserves, informed the district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.