मोबाईल टॉवरचे आमिष दाखवून नागपुरात सव्वा लाखांनी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:04 AM2018-01-04T10:04:05+5:302018-01-04T10:04:25+5:30

मोबाईल टॉवरसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास वर्षाला लाखो रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तुलाराम रामआधार वर्मा (वय ४०, रा. दुर्गानगर, कळमना) यांची फसवणूक केली.

Nagpur person looted by showing the lure of mobile towers | मोबाईल टॉवरचे आमिष दाखवून नागपुरात सव्वा लाखांनी लुबाडले

मोबाईल टॉवरचे आमिष दाखवून नागपुरात सव्वा लाखांनी लुबाडले

Next
ठळक मुद्देवृत्तपत्रातील जाहिरात वाचून केला होता फोन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मोबाईल टॉवरसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास वर्षाला लाखो रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तुलाराम रामआधार वर्मा (वय ४०, रा. दुर्गानगर, कळमना) यांची फसवणूक केली. एका हिंदी वृत्तपत्रात वर्मा यांनी २१ नोव्हेंबरला ही जाहिरात पाहिली होती. त्यावर संपर्क क्रमांक होता. त्या मोबाईल क्रमांकावर वर्मा यांनी संपर्क केला असता तिकडून बोलणाºया व्यक्तीने मोबाईल टॉवरसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास तुम्हाला वर्षाकाठी लाखो रुपये भाडे मिळेल असे सांगितले. ते ऐकून वर्मा यांनी आरोपीने सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारचे शुल्क जमा करण्याची तयारी दाखवली. एवढेच नव्हे तर स्टेट बँकेच्या खाते क्रमांक ३५०८५० ९६३८६ मध्ये १ लाख, १६ हजार, ८५० रुपये जमा करायला लावले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने वर्मा यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वर्मा यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Nagpur person looted by showing the lure of mobile towers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा