नागपुरात दारुऐवजी सॅनिटायझर पिल्याने जीव गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 08:30 PM2020-06-29T20:30:57+5:302020-06-29T20:31:54+5:30

व्यसनाधीन व्यक्ती दारूऐवजी सॅनिटायझर पिल्यामुळे त्याचा जीव गेला. गौतम बिसेन गोस्वामी (वय ४५) असे मृताचे नाव असून तो कोतवालीतील गुजरवाडीत राहत होता.

In Nagpur, person lost his lives by drinking sanitizer instead of alcohol | नागपुरात दारुऐवजी सॅनिटायझर पिल्याने जीव गमावला

नागपुरात दारुऐवजी सॅनिटायझर पिल्याने जीव गमावला

Next
ठळक मुद्देसफाई कर्मचारी : कोतवालीत घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यसनाधीन व्यक्ती दारूऐवजी सॅनिटायझर पिल्यामुळे त्याचा जीव गेला. गौतम बिसेन गोस्वामी (वय ४५) असे मृताचे नाव असून तो कोतवालीतील गुजरवाडीत राहत होता.
महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या गौतमला दारूचे भारी व्यसन होते. २१ जूनला त्याला पुरेशी दारू न मिळाल्यामुळे तो सॅनिटायझर पिला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला औषध गोळ्या देऊन घरी पाठविले. दोन दिवसांनी गौतमची पुन्हा प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

नागपुरातील पहिलीच घटना
सॅनिटायझर प्राशन केल्यामुळे कुण्या व्यक्तीचा जीव गेल्याची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन च्या काळात मद्य विक्रीवर पूर्णत: बंदी असल्यामुळे अनेकांनी शीतपेयात सॅनिटायझर मिसळून पिणे सुरू केले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असल्यामुळे काही वेळासाठी पिणाऱ्याला झिंग येते. त्यामुळे अनेक मद्यपी दुधाची तहान ताकावर भागवावी तसे शीतपेयात सॅनिटायझर टाकून ते पिऊन नशा करीत होते. तर अनेक जण दारू म्हणून सॅनिटायझरची विक्री करत होते. शांतीनगर, लकडगंज, नंदनवनमध्ये अशा प्रकारच्या घटनाही उघडकीस आल्या. मात्र सॅनिटायझर पिऊन कुणाचा जीव गेल्याचे उघडकीस आलेली नागपुरातील ही पहिलीच घटना आहे.

Web Title: In Nagpur, person lost his lives by drinking sanitizer instead of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.