नागपुरात पेट्रोल ९५ रुपयांवर , डिझेल ८५.८५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 08:56 PM2021-02-12T20:56:47+5:302021-02-12T21:00:02+5:30
petrol, diesel hike पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेल्या चार दिवसांपासून वाढ होत आहे. शुक्रवारी पेट्रोलचे दर ९५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीत डिझेलही मागे नसून भाव ८६ रुपयांजवळ पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेल्या चार दिवसांपासून वाढ होत आहे. शुक्रवारी पेट्रोलचे दर ९५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीत डिझेलही मागे नसून भाव ८६ रुपयांजवळ पोहोचले आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, जगणे कठीण झाले आहे. त्याची शासनाला चिंता नसल्याचे दिसून येत आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ६१ डॉलर प्रतिबॅरल या कमी स्तरावर आहे. त्यानुसार नागपुरात पेट्रोलचा दर ३१.५० रुपये प्रतिलीटर होतो. पण केंद्र आणि राज्य शासनाचे विविध कर आणि सेसमुळे पेट्रोलचे दर ९५ रुपयांवर गेले आहेत. हीच स्थिती डिझेलची आहे. वर्ष २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०५ डॉलर प्रतिबॅरल असतानाही पेट्रोल मे २०१४ मध्ये नागपुरात पेट्रोल ७१.४१ आणि डिझेल ५६.७१ रुपये अर्थात भाव सध्याच्या तुलनेत कमी होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत कमी झाले होते. नागपुरात पेट्रोल आणि डिझेल दरदिवशी महाग होत असल्याने सर्वसामान्य आणि वाहतूकदारांचे जगणे कठीण झाले आहे.
पेट्रोल, डिझेलचे प्रतिलीटर रुपये दर
तारीख पेट्रोल डिझल
८ फेब्रु. ९३.९८ ८४.५३
९ फेब्रु. ९४.३२ ८४.९०
१० फेब्रु. ९४.६१ ८५.१६
११ फेब्रु. ९४.८५ ८५.४८
१२ फेब्रु. ९५.१५ ८५.८५