नागपूर पोक्सो न्यायालय : बलात्काऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:08 AM2017-11-30T00:08:35+5:302017-11-30T00:10:05+5:30

Nagpur POCSO court: 10 years rigorous imprisonment for rapist | नागपूर पोक्सो न्यायालय : बलात्काऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास

नागपूर पोक्सो न्यायालय : बलात्काऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास

Next
ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून केले होते कृत्य

आॅनलाईन लोकमत
नागपूर : उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या  एका आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अमित रंगलाल शेंडे असे आरोपीचे नाव असून, तो उमरेडच्या मंगळवारी झोपडपट्टी भागातील रहिवासी आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी ३१ आॅगस्ट २०१५ रोजी भादंविच्या ३७६(२)(एन) आणि लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी अमित शेंडे याला अटक केली होती.
आरोपी हा वारंवार पीडित मुलीच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने जात होता. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. ही ओळ मैत्रीत परिवर्तित झाली होती. पुढे लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर तो वारंवार हे कृत्य करू लागला होता. या प्रकाराने तिला गर्भधारणाही झाली होती. पीडित मुलीने अमितला लग्नाची गळ घातली असता त्याने तिचे आणखी दोन-तीन मुलांशी संबंध असल्याचे सांगून लग्नास नकार दिला होता. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. न्यायालयात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला ३७६(२)(एन) कलम अन्वये १० वर्षे आणि २ हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ४ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारारच्या वतीने सहायक सरकारी वकील आसावरी पळसोदकर यांनी काम पाहिले.

 

 

Web Title: Nagpur POCSO court: 10 years rigorous imprisonment for rapist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.