Nagpur: प्रवाशांचा जीव वाचण्यासाठी चालकाचे दर्शनी भागात छायाचित्र, पोलिस व आरटीओची मोहीम
By सुमेध वाघमार | Published: November 4, 2023 06:59 PM2023-11-04T18:59:53+5:302023-11-04T19:00:13+5:30
Nagpur: समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा परिसरात १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २५ जीव गेले. या अपघातात बचावलेल्या बस चालकाच्या रक्तात 'अल्कोहोल'चे प्रमाण अधिक आढळले होते.
- सुमेध वाघमारे
नागपूर : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा परिसरात १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २५ जीव गेले. या अपघातात बचावलेल्या बस चालकाच्या रक्तात 'अल्कोहोल'चे प्रमाण अधिक आढळले होते. या प्रकरणाला गंभीरतेने घेत ट्रॅव्हल्स चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांची तक्रार करणे सोपे होण्यासाठी आणि प्रवाशांचा जीव वाचण्यासाठी बसच्या दर्शनी भागात चालकाच्या छायाचित्रासह त्याचा भ्रमणध्वनी व वाहनाची माहिती लावणे बंधनकारक करण्यात आले.
'विदर्भ ट्रॅव्हल्स'ची ही बस नागपूरवरून पुण्याला समृद्धी महामागार्ने जात असताना पहाटे बस उलटून लागलेल्या आगीत प्रवासी होरपळून मरण पावले. आठ प्रवाशांना वेळीच बाहेर पडता आल्याने ते बचावले. यात बसचा चालक शेख दानिश शेख इस्माइल याचाही समावेश होता. या बसचालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करत अटक केली. न्यायवैद्यक चमूने त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असता ०.३० इतके अल्कोहोलचे प्रमाण आढळले होते. या प्रकरणानंतरही काही ट्रॅव्हल्स चालकांनी धडे घेतले नाहीत. मोबाइलवर संवाद साधणे, महिला प्रवाशांसोबत गैरवर्तनासह इतरही ब?्याच घटना घडल्या. सोशल मीडियावर नुकताच एका खासगी ट्रॅव्हल्सचा बसचालक वाहन चालवताना मोबाइलवर चित्रपट बघत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी नागपुरात शहर पोलिस, प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्तरीत्या एक अभिनव प्रकल्पावर काम करणे सुरू केले. त्यानुसार संबंधित ट्रॅव्हल्सच्या दर्शनी भागात बसचालकाचे छायाचित्र, त्याचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता आदी माहिती लावणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे कोणाला बसचालक किंवा बसमधील सोयीसुविधेची तक्रार असल्याने ते नावानिशी संबंधित यंत्रणेकडे करू शकतील. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल.
लवकरच ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचननेुसार ट्रॅव्हल्स बसच्या दर्शनी भागात वाहन चालकासोबतच वाहनाच्या तपशिलाची माहिती लावणे बंधनकारक करण्यात आले. याच्या सूचना सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच या सर्वांची बैठक घेऊन, त्यांच्या समस्यांचे निराकरण करून तपासणी मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.
-रवींद्र भुयार (उपप्रादेशिक परिवहन अधिकार)