नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:00 AM2018-10-10T01:00:27+5:302018-10-10T01:01:11+5:30

शहरातील विविध भागातून दुचाक्या चोरून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात अखेर नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या टोळीच्या ताब्यातून चोरीची ३३ वाहने जप्त करण्यात आली. आणखी अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

Nagpur police arrested a gang of bikes thieves | नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली

नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली

Next
ठळक मुद्देचोरीच्या ३३ दुचाक्या जप्त : नंदनवन पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागातून दुचाक्या चोरून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात अखेर नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या टोळीच्या ताब्यातून चोरीची ३३ वाहने जप्त करण्यात आली. आणखी अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
नंदनवनच्या दर्शन कॉलनीत राहणारे अक्षय सुधाकर रामटेके यांची दुचाकी ७ ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान चोरीला गेली होती. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. दोन दिवसांपूर्वी हिवरी नगरात शुभम महेंद्र मराठे (वय २५, रा. पडोळेनगर, नंदनवन) हा दुचाकी चोरण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याने दुचाकीचोरीची कबुली देऊन साथीदार अनिल अशोक ढोके (वय २४, रा. निमखेडा, पारशिवनी) तसेच साहिब ऊर्फ साहील खान साहीद खान (वय ३०, रा. गौसिया कॉलनी, हुडकेश्वर) यांची नावे सांगितली. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली. चौकशीत या टोळीने नंदनवनमध्ये १२, सक्करदरात २, लकडगंजमध्ये २, कळमना १ आणि रायपूरमध्ये १ असे १८ दुचाकीचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली.

नाल्याला बनविले पार्किंग स्थळ
उपरोक्त चोरट्यांनी पारशिवनी जवळच्या एका नाल्याला पार्किंग स्थळ बनविले होते. तेथे त्यांनी चोरीच्या ३३ दुचाक्या लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्याची किंमत १४ लाख, ७० हजार रुपये आहे. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण, द्वितीय निरीक्षक मुकुंद साळवे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक धाडगे, उपनिरीक्षक थोरात, एस. डी. जायभाये, हवालदार सचिन श्रीकांत, अमोल भीमराव, शिपायी दीपक, पंकज प्रवीण, अभय अणि महिला शिपाई रेणुका यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Nagpur police arrested a gang of bikes thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.