नागपुरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 08:31 PM2020-07-21T20:31:27+5:302020-07-21T20:36:37+5:30

लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

In Nagpur, the prices of vegetables high | नागपुरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

नागपुरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

googlenewsNext


लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

फळांचे भाव लॉकडाऊनपूर्वी (कि़ रु.)         लॉकडाऊननंतर (कि़ रु)
सफरचंद १८० ते २००                                २०० ते २२०
मोसंबी ५० ते ६०                                      ६० ते ८०
डाळिंब १४० ते १६०                                   १६० ते १८०
संत्री (डझन) ५० ते ७०                            ६० ते ८०
पायनॅपल ५० ते ६०                                 ४० ते ५०
पपई ४० ते ५०                                        ३० ते ४०
केळी (डझन) ४० ते ५०                          ४० ते ५०

या कारणांमुळे वाढले भाव
लॉकडाऊनपूर्वी ठोक बाजारात टोमॅटोची आवक जास्त होती. भाव ५ रुपये किलो होते. किरकोळ बाजारात ७ ते १५ रुपयांपर्यंत विक्री व्हायची. कमी भावामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची माल वाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतातच नष्ट केला. शिवाय पुन्हा लागवडही केली नाही. लॉकडाऊननंतर आवक अल्पशी असल्याने किरकोळमध्ये भाव ६० ते ७० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना हक्काचा बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे शहरातच्या विविध बाजारात कमी किमतीत माल विकून शेतकरी गावाकडे परत जायचे. जवळपास अडीच महिने शेतकऱ्यांना तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागली. आता लागवड कमी असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत.

लिंबाच्या भावातही वाढ
कोरोनावर मात करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबूचा रस रोज पिण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्याने प्रत्येकाने लिंबाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे एरवी १० रुपयांत ४ नग मिळणारे लिंबू ५ रु. वा १० रुपये नगाप्रमाणे विकले गेले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.
सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे.
संपदा सोनी, गृहिणी.

कोरोनामुळे बाहेरच्या राज्यातून फळांची आवक कमी आहे. त्यामुळे विक्रेत्यांना जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे फळांचे भाव वाढले आहेत.
दुर्गाप्रसाद चौधरी, फळांचे व्यापारी.

स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक थांबल्याने कळमन्यातून जास्त भावात भाज्यांची खरेदी करून किरकोळमध्ये विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.
संतोष लांबट, भाजीपाला विक्रेते.

खरीपाच्या हंगामात शेतकरी गुंतल्याने भाज्यांची लागवड कमी केली. आता पेरणी आटोपली असून भाज्यांची लागवड सुरू झाली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भाज्या बाजारात येतील.
कवडू आंबटकर, शेतकरी.

मुसळधार पावसाने कोथिंबीर खराब
मान्सूनच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कोथिंबीर खराब झाले. त्यामुळे बाजारात आवक अल्प झाल्याने भाव वाढले. २५ ते ३० रुपये किलोचे कोथिंबीर ५० रुपयांवर पोहोचले. नवीन कोथिंबीर येण्यास दोन महिने लागतील. सध्या नाशिक व संगमनेर येथून आवक सुरू आहे.

Web Title: In Nagpur, the prices of vegetables high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.