स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 07:52 PM2020-01-27T19:52:21+5:302020-01-27T19:55:28+5:30
स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौरसंदीप जोशी यांनी रविवारी केले. सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालयात महापौर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रगती पाटील, रुपा राय, सुनील हिरणवार, भगवान मेंढे, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.
जुन्या बसेस बायोसीएनजीवर करण्यात आल्या. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, ई-रिक्षा, सोलरवरील मेट्रो आदींचा उहापोह त्यांनी केला. स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध अभियानाचीही माहिती संदीप जोशी यांनी दिली. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान लोकशाही पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून, या काळात मतदार नोंदणी करा आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन केले.
यावेळी स्वच्छतादूत म्हणून सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे निवृत्त शाखा व्यवस्थापक सुनील भागवत, स्वच्छताविषयक जनजागृती करणाºया तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्ष किरण मुंधडा, रस्ता सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मनपा आसीनगर झोनचे कनिष्ठ कर आकारणी निरीक्षक चंद्रशेखर मोहिते, अग्निशमन विभागाच्या सक्करदारा केंद्राचे ऐवजदार वाहनचालक शब्बीर शेख यांचा महापौरांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी महापौर व आयुक्त यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या अग्निशमन विभागाच्या परेडची मानवंदना स्वीकारली. संचालन एनएसएसडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी तर आभार सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त राजेश मोहिते, निर्भय जैन, डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, सर्व विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कर्मचारी उपस्थित होते.