नागपुरात  चाचण्यांच्या तुलनेत नव्या रुग्णाचे प्रमाण २०.५१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:38 PM2020-10-19T21:38:59+5:302020-10-19T21:39:58+5:30

Corona Virus Test, Nagpur News सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी व्हायला लागली. त्या तुलनेत दैनंदिन चाचण्याही कमी झाल्या आहेत. मार्च ते १९ ऑक्टाेबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात ५,०५,०८३ चाचण्या झाल्या. यातून १,०३,६१० चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. एकूण चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) जवळपास २०.५१ टक्के आहे.

In Nagpur, the proportion of new patients compared to tests is 20.51 per cent | नागपुरात  चाचण्यांच्या तुलनेत नव्या रुग्णाचे प्रमाण २०.५१ टक्के

नागपुरात  चाचण्यांच्या तुलनेत नव्या रुग्णाचे प्रमाण २०.५१ टक्के

Next
ठळक मुद्देचाचण्यांची कमी संख्या चिंता वाढविणारी : आठ हजारावर गेलेल्या चाचण्या सहा हजारावर आल्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी व्हायला लागली. त्या तुलनेत दैनंदिन चाचण्याही कमी झाल्या आहेत. मार्च ते १९ ऑक्टाेबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात ५,०५,०८३ चाचण्या झाल्या. यातून १,०३,६१० चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. एकूण चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) जवळपास २०.५१ टक्के आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. ही बाब चिंता वाढविणारी आहे.

मागील काही दिवसांत रुग्ण कमी दिसत असले तरी चाचण्यांचे प्रमाणही तुलनेने कमी झाले आहे. सर्वाधिक चाचण्या १६ सप्टेंबर रोजी झाल्या. रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्या मिळून ८,२१६ झाल्या होत्या. तर सर्वाधिक रुग्णांची नोंद १३ सप्टेंबर रोजी झाली होती. २,३४३ रुग्णांचा विक्रम झाला होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात पाच ते सहा हजाराच्या घरात चाचण्या होत आहेत, त्या तुलनेत जवळपास ४०० ते ५०० नव्या रुग्णांची नोंद होत आहे. एप्रिल महिन्यात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २.७९ टक्के, मे महिन्यात ३.५१ टक्के, जून महिन्यात ४.५२ टक्के, जुलै महिन्यात ९.६७ टक्के, ऑगस्ट महिन्यात २३.६४ टक्के तर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे, २७.९४ टक्क्यांवर गेले होते. मागील १८ दिवसांत हेच प्रमाण १५.८५ टक्क्यांवर आले आहे.

महिना     चाचण्या      रुग्ण

एप्रिल       ३५७४        १००

मे             १५२१७      ५३५

जून          २१६३६      ९७९

जुलै         ३९८१८      ३८५२

ऑगस्ट    १०६७०४   २५२२९

सप्टेंबर     १८६६१३   ५२१५२

ऑक्टोबर १३०९२१   २०७६३

(१९ पर्यंत)

सध्या कोरोनाचे एकूण रुग्ण

९०,६७५

उपचार घेऊन घरी परतलेले

८१,३५९

उपचार सुरू असलेले

६,३६९

होम आयसोलेशनमध्ये

४,४०१

कोरोनाचे एकूण बळी

२,९४७

जुलैपासून रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांना सुरूवात झाली. सप्टेंबर महिन्यात आरटीपीसीआरच्या तुलनेत ॲन्टिजेन चाचण्या वाढल्या. ऑक्टोबर महिन्यात आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढल्या. सध्या लक्षणे असलेले व बाधितांच्या संपर्कात आलेलेच चाचण्या करीत आहेत.

ग्रामीण भागात व शहरातील महानगरपालिकेच्या दहाही झोनमध्ये नि:शुल्क चाचण्यांची सोय करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत घट आली असलीतरी चाचणी केंद्रांची संख्या कमी करण्यात आलेली नाही. बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जात आहे. तसेच लक्षणे असलेले रुग्ण स्वत:हून तपासणी करीत आहे. एकूणच रुग्णसंख्येत घट आल्याने चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

-डॉ. संजय जयस्वाल

उपसंचालक, आरोग्य विभाग

Web Title: In Nagpur, the proportion of new patients compared to tests is 20.51 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.