नागपुरात चार तासात आठ अड्ड्यांवर धाडी: मटका, दारू अड्डेचालकांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:45 AM2018-07-28T00:45:47+5:302018-07-28T00:47:04+5:30

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने त्यांच्या परिक्षेत्रातील जुगार, मटका आणि दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाईची मोहीम राबविली. सायंकाळी ५ वाजतापासून सुरू झालेल्या या धडक कारवाईत रात्री ९ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठाण्यातील पोलीस पथकांनी आठ ठिकाणी छापेमारी केली. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

In Nagpur, raid on eight dens | नागपुरात चार तासात आठ अड्ड्यांवर धाडी: मटका, दारू अड्डेचालकांचे धाबे दणाणले

नागपुरात चार तासात आठ अड्ड्यांवर धाडी: मटका, दारू अड्डेचालकांचे धाबे दणाणले

Next
ठळक मुद्देडीसीपी पथकाच्या कारवाईमुळे झोन-४ मध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने त्यांच्या परिक्षेत्रातील जुगार, मटका आणि दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाईची मोहीम राबविली. सायंकाळी ५ वाजतापासून सुरू झालेल्या या धडक कारवाईत रात्री ९ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठाण्यातील पोलीस पथकांनी आठ ठिकाणी छापेमारी केली. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
परिमंडळ चारमध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे, त्यांच्या विरोधात एकाच वेळी कारवाई करण्याचे निर्देश डीसीपी भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिले. त्यानुसार, सायंकाळी ५ वाजता बेलतरोडी पोलिसांनी खापरीतील भारत पेट्रोल पंपाजवळच्या मटका अड्ड्यावर छापा घातला. हा मटका अड्डा चालविणाºया मधुकर केशवराव फटींग (वय ३४, रा. परसोडी) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून रोख आणि मटक्याच्या पट्टी जप्त करण्यात आल्या.
बेलतरोडी पोलिसांनीच खपारतील पंजाबी ढाब्याजवळ अवैध देशी दारू विकणाºया राकेशकुमार पुनितराम शाहू (वय २८, रा. शंकरनगर दुर्ग, छत्तीसगड) याला अटक केली. त्याच्याकडून देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
खामल्यातील सिंधी कॉलनीत राहणारा आशिष सेवकराम डेंबवानी (वय २४) याच्या मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर छापा घालून बेलतरोडी पोलिसांनी रोख आणि सट्टापट्टीसह १७ हजार, १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
इमामवाडा पोलिसांनी सिरसपेठमध्ये अवैध दारू अड्डा चालविणाºया गौरव विनोद गाडवे (वय ३५) याला ताब्यात घेऊन देशी दारू जप्त केली. अशीच कारवाई वकिलपेठेतील बबलू राजेश गजभिये (वय ३५) याच्या अड्ड्यावरही पोलिसांनी केली.
नंदनवनमधील मटका किंग अनिसखान इस्माईल खान पठाण याच्या अड्ड्यावर छापा घालून पोलिसांनी रोख आणि सट्टापट्टी जप्त केली. नंदनवनमध्ये दुसरी कारवाई मोहम्मद आरिफ मोहम्मद आरिफ मोहम्मद आबिद अन्सारी (वय ४२, रा. बंगाली पंजा) याच्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी केली. वृत्त लिहिस्तोवर आणखी काही ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई सुरू होती.

 

Web Title: In Nagpur, raid on eight dens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.