नागपुरात  कुख्यात मेश्रामच्या मटका अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:11 AM2019-02-13T00:11:24+5:302019-02-13T00:13:31+5:30

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने रामबागमधील कुख्यात लंकेश मेश्राम याच्या मटका अड्ड्यावर आज मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी सहा जणांना अटक करून रोख, मोटरसायकली, मोबाईलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

In Nagpur, raid on the notorious Meshram's satta den | नागपुरात  कुख्यात मेश्रामच्या मटका अड्डयावर छापा

नागपुरात  कुख्यात मेश्रामच्या मटका अड्डयावर छापा

Next
ठळक मुद्देसहा जुगारी सापडले : सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने रामबागमधील कुख्यात लंकेश मेश्राम याच्या मटका अड्ड्यावर आज मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी सहा जणांना अटक करून रोख, मोटरसायकली, मोबाईलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
कुख्यात मेश्राम गेल्या अनेक वर्षांपासून पेशुमल धर्मशाळेजवळ मटक्याचा अड्डा चालवून रोज हजारोंची लगवाडी, खायवाडी करतो. ही माहिती कळताच उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाड्याचे ठाणेदार एम. एम. साळुंके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या मटका अड्ड्यावर छापा मारला. विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंके यांनी इमामवाड्याचे ठाणेदार म्हणून आजच पदभार सांभाळला आणि रात्री ८ वाजता छापा मारला. तेथे पोलिसांना आरोपी निशांत दिनेश शंभरकर (वय ३९, रा. रामबाग), प्रदीप रामचंद्र उमरे (वय ५०, रा. चंद्रमणीनगर), राजा धनराज मांजरे (वय ४०, रा. राजाबाक्षा वसाहतीजवळ), सतीश गुरुदेव गाणार (वय ४२, रा. उंटखाना), पृथ्वीराज एकनाथ तागडे (वय ५४, रा. अजनी) आणि राजेश राजू गुप्ता (वय ५४, नंदनवन) हे जुगारी सापडले. तर, मटका अड्डा चालविणारा लंकेश मेश्राम (वय ६०, रा. रामबाग) पळून गेला. उपरोक्त आरोपींविरुद्ध पोलिसांनी जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १४,१२० रुपये, दोन मोटरसायकली, पाच मोबाईलसह १ लाख, १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
वारंवार कारवाई, अड्डा मात्र सुरूच
छापा पडणार अशी कुणकुण लागताच मुुख्य आरोपी मेश्राम फरार झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी मेश्रामच्या अड्ड्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केली असून, त्याच्याविरुद्ध हद्दपारीचीही कारवाई केली. मात्र, त्याच्यावर परिणाम झालेला नाही. फरार मेश्रामचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: In Nagpur, raid on the notorious Meshram's satta den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.