नागपूर रेल्वस्थानकावर २६ अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:56 PM2019-03-26T17:56:12+5:302019-03-26T17:56:46+5:30

दानापूर-सिकंदराबाद (गाडी क्र. १२७९२) एक्सप्रेसमधून बालमजुरीसाठी नेल्या जात असलेल्या २६ अल्पवयीन मुलांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले व त्यांना नेणाऱ्यांना अटक केली.

In Nagpur Railway Station, 26 minor children have been taken away by the Railway Police | नागपूर रेल्वस्थानकावर २६ अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूर रेल्वस्थानकावर २६ अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देबाल तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दानापूर-सिकंदराबाद (गाडी क्र. १२७९२) एक्सप्रेसमधून बालमजुरीसाठी नेल्या जात असलेल्या २६ अल्पवयीन मुलांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले व त्यांना नेणाऱ्यांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी २.५५ च्या सुमारास करण्यात आली.
ही गाडी दुपारी दोन क्रमांकाच्या फलाटावर लागल्यानंतर एस ८,९, १० व ११ व जनरल कोच या बोगींमधून १२ ते १८ या वयोगटातील एकूण २६ मुले नेत असल्याची बातमी रेल्वे पोलिसांना लागली. या मुलांना सिकंदराबाद येथे इमारतीच्या बांधकामासाठी नेण्यात येत होते. ही मुले बिहार व मध्यप्रदेशातल्या विविध ठिकाणांहून आली होती. याची बातमी कळताच आरपीएफची दोन माणसे नरखेडहून या गाडीत शिरली. त्यांनी या मुलांना व त्यांना नेणाऱ्यांना हेरून ठेवले व तशी सूचना नागपूर रेल्वे पोलिसांना दिली.
ही गाडी स्टेशनमध्ये शिरण्याआधीच फलाट क्र. २ वर आरपीएफ व अन्य अधिकाऱ्यांची चमू हजर होती. त्यांनी तात्काळ या मुलांना व त्यांना नेणाºयांना ताब्यात घेतले. अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीसोबत आरपीएफचे दोन जवान गाडीसोबत पुढे रवाना झाले.

Web Title: In Nagpur Railway Station, 26 minor children have been taken away by the Railway Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.