नागपूर रेल्वेस्थानक : १६ हजार मोरपंखासह आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:40 PM2018-09-13T21:40:41+5:302018-09-13T21:43:20+5:30

रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी १६ हजार मोरपंख नागपुरात विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला अटक करून वन विभागाच्या सुपुर्द केले.

Nagpur railway station: The accused arrested with 16 thousand peacocks feathers | नागपूर रेल्वेस्थानक : १६ हजार मोरपंखासह आरोपीला अटक

नागपूर रेल्वेस्थानक : १६ हजार मोरपंखासह आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देआगरा येथून मोरपंख विक्रीसाठी नागपुरात आणल्याची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी १६ हजार मोरपंख नागपुरात विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला अटक करून वन विभागाच्या सुपुर्द केले.
नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी ८ वाजता वन्यजीव संरक्षक कार्यकर्ता दीपक कुम्र बलजीत सिंह (२६) रा. रोहणी नवी दिल्ली यांनी एक व्यक्ती प्लॅटफार्म क्रमांक ३ वर मुंबई एण्डकडील भागात मोरपंखाच्या बंडलसह उभी असल्याची माहिती आरपीएफ ठाण्यात दिली. त्यावर ड्युटीवर तैनात आरपीएफचे उपनिरीक्षक राजेश औतकर, शेषराव पाटील यांनी संबंधित व्यक्तीला पकडून आरपीएफ ठाण्यात आणले. त्याने आपले नाव राजीवसिंह उदयसिंह (२१) रा. बिरोंधी, जि. इटावा, उत्तरप्रदेश असे सांगितले. आगरा येथून हे मोरपंख विक्रीसाठी नागपुरात आणल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आर. एस. आदमने यांना सूचना देण्यात आली. ते येताच आरोपीला मोरपंखासह वन विभागाच्या सुुपुर्द करण्यात आले.

Web Title: Nagpur railway station: The accused arrested with 16 thousand peacocks feathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.