नागपूर रेल्वेस्थानक; रस्त्यावरील धूळ समोसा, कचोरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:30 AM2019-07-13T10:30:20+5:302019-07-13T10:30:41+5:30

नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या शेजारी ठेलेवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. परंतु येथे खाद्यपदार्थ विकताना नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठलीच खबरदारी घेण्यात येत नसल्याची बाब जाणवली.

Nagpur railway station; The dust on the roadside Samosa, Kachori | नागपूर रेल्वेस्थानक; रस्त्यावरील धूळ समोसा, कचोरीवर

नागपूर रेल्वेस्थानक; रस्त्यावरील धूळ समोसा, कचोरीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या शेजारी ठेलेवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. परंतु येथे खाद्यपदार्थ विकताना नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठलीच खबरदारी घेण्यात येत नसल्याची बाब जाणवली. उघड्यावर तेथे खाद्यपदार्थ तयार केली जातात आणि ती खुल्यावर ठेवूनच विकली जातात. त्यावर रस्त्यावरील धूळही उडते.

खाद्यपदार्थांच्या शेजारीच डस्टबिन
रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक आमलेट विक्रेता आहे. रस्त्यावरच त्याने दुकान थाटले आहे. आमलेट तयार करण्यासाठी असलेला तवा आणि इतर खाद्यपदार्थांच्या बाजूलाच या दुकानदाराने डस्टबिन ठेवलेली आढळली. याशिवाय दुकानाच्या मागील बाजूने नालीत घाण पाणी साचलेले होते. अशा वातावरणात ग्राहकांना तो खाद्यपदार्थ देत होता.

समोसा अन् कचोरी उघडीच
रेल्वेस्थानकासमोरील राजकुमार हॉटेल आणि न्यू जनता हॉटेलमध्ये समोसा आणि कचोरी उघड्यावर विक्रीसाठी ठेवले होते. समोरच मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरील धूळ सहज या खाद्यपदार्थांवर जाऊ शकते. तरीसुद्धा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे खाद्यपदार्थ झाकून ठेवण्याची तसदी दोन्ही हॉटेल्सचालकांनी घेतली नाही.

उघड्यावर ठेवले पोहे
रेल्वेस्थानक परिसरात डीआरएम कार्यालयाच्या समोर सेंट्रल एव्हेन्यु मार्गावर एका पोहेवाल्याचा ठेला आहे. या दुकानदाराने पोहे तयार करून ते ठेल्याच्या सर्वात वरच्या भागात ठेवलेले होते. या मार्गावरून दिवसाकाठी हजारो वाहने ये-जा करतात. त्यांचा धूर आणि रस्त्यावरील धूळ सहजच या पोह्यांवर बसते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून हा विक्रेता पोहे विकत होता.

Web Title: Nagpur railway station; The dust on the roadside Samosa, Kachori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.