नागपूर रेल्वेस्थानक : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 10:57 PM2019-05-03T22:57:19+5:302019-05-03T22:58:35+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार दलालांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४८ ई-तिकीटांसह २ लाख ७५ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार दलालांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४८ ई-तिकीटांसह २ लाख ७५ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत आरोपी संजय ईश्वरलाल चैनानी (२७) बालाजी सर्व्हिसेस, काठीओळी सिंधी भवनच्या बाजुला, कामठी हा अवैधरीत्या वैयक्तिक आयडीवर ई-तिकीट काढून प्रवाशांना देत होता. त्याच्याकडून १६ ई-तिकीट किंमत २२९७५, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल आणि रोख ५६५० असा ६८ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत सोहेल शकील अन्सारी (३१) हाफीज ब्रदर्स, रुईगंज जी. एन. रोड, कामठी हा दोन लाईव्ह तिकीट आणि १७ ई-तिकीट विकताना आढळला. त्याच्याकडून एकूण ४८ हजार ४२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसºया कारवाईत मो. अफजल मो. असलम रब्बानी (३२) स्टार सर्व्हिसेस, इस्माईलपुरा मस्जिदजवळ, येरखेडा रोड, कामठी हा दुकान चालवितो. त्याच्याकडून वैयक्तिक आयडीवरून काढलेले १७ ई-तिकीट किंमत १४८३०, लाईव्ह ई- तिकीट किंमत १६१०, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल रोख ७०० रुपये असा एकूण ६५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौथ्या कारवाईत लकी नरेंद्र जैस्वाल (२५) स्कायनेट सर्व्हिसेस, खापरखेडा रोड, पारशिवनी हा दुकान चालवितो. त्याच्या जवळून वैयक्तिक २ आयडीवरून १३ ई-तिकीट किंमत २६२५९, लाईव्ह ई-तिकीट किंमत १२६०, डेस्कटॉप, प्रिंटर, मोबाईल आणि रोख १७० रुपये असा एकूण ९३ हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चारही कारवाईत एकूण २ लाख ७५ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मो. मुगिसुद्दीन, मोहन लाल, सतीश इंगळे, प्रकाश रायसेडाम, अरुण थोरात, ईशांत दीक्षित, सुभाष आदवारे, सी. रहांगडाले यांनी पार पाडली.