नागपूर : अल्पवयीन मुलीसह दोघींवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:47 PM2017-08-10T23:47:46+5:302017-08-10T23:47:50+5:30
एका १६ वर्षीय विद्यार्थीनीसह दोघींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सदर आणि मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
नागपूर, दि. 10 - सदरमधील एका १६ वर्षीय विद्यार्थीनीसह दोघींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सदर आणि मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
आरोपी अश्विन मधुकरराव डोंगरे (वय २०) याने सदरमधील त्याच्याच वस्तीत राहणा-या मैत्रीणीला मित्राचे आॅफिस दाखवतो, असे सांगून १ आॅगस्टला रात्री ७.३० वाजता उत्कर्ष निर्माण सोसायटीत नेले. तेथे एका सदनिकेत नेल्यानंतर मैत्रीणीवर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे ठार मारेन, अशी आरोपीने धमकी दिली होती. त्यामुळे ती आठ दिवस गप्प बसली. नंतर मात्र आरोपीचा त्रास वाढल्याने तिने बुधवारी सायंकाळी सदर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना मानकापुरातील आहे. ३० वर्षीय प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून २०१४ पासून प्रेयसीसोबत अनेकदा शारिरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीचे नाव सचिन गवई असून तो अहमदाबाद मध्ये राहतो. त्याची बहिण पीडित तरुणी (वय २४) च्या घराजवळ राहते. ते नातेसंबंधातील असल्यामुळे त्यांच्यात ओळखी होती. पहिल्यांदा २०१४ मध्ये एक दिवस बहिणीच्या घरी आल्यानंतर तो तिला घेऊन गोधणीच्या नाल्याजवळ फिरायला गेला. तेथे निर्जन ठिकाणी त्याने तिच्यासोबत शरिरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर कधी, कुठे तर कधी कुठे जाऊन ते शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. चिखलदरा येथेही ते पती-पत्नीसारखे फिरायला गेले होते. सदरमधील एका हॉटेलमध्येही त्यांनी श्रिरसंबंध जोडले. अलिकडे मात्र तो तिला टाळू लागला.
हिच्यासोबत नोंदणी, दुसरीसोबत सगाई -
युवतीच्या माहितीनुसार, तिने लग्नासाठी दबाव वाढवल्यामुळे मे २०१७ मध्ये त्याने तिला निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करायला नेले. तेथे त्याने नोंदणी केली. मात्र, तीन वेळा वेगवेगळी तारिख भेटूनही तो वेगवेगळे कारण सांगून टाळू लागला. दरम्यान त्याने अकोल्यातील एका तरुणीसोबत लग्न जोडून सगाई केल्याचे माहित पडताच तरुणी जाम भडकली. तिने त्याला फोन करून लग्नाबद्दल विचारले. त्याने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गुरुवारी ती मानकापूर ठाण्यात पोहचली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.