नागपूर पोहोचले ४४.३ डिग्री सेल्सिअसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 09:07 PM2019-04-25T21:07:44+5:302019-04-25T21:09:20+5:30
नागपूरचे तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने वाढून ४४.४ डिग्री सेल्सिअवर पोहोचले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने वाढून ४४.४ डिग्री सेल्सिअवर पोहोचले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर पुन्हा एकदा प्रचंड तापू लागले आहे. बुधवारी तापमान ४३.४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होेते ते सरासरीपेक्षा दोन डिग्री अधिक होते. आज गुरुवारी यात पुन्हा एक अंशाची भर पडली असून नागपूरचे तपमान गुरुवारी ४४.३ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. गुरुवारी विदर्भात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ४६.३ डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच अमरावती ४५ डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरी ४५.५ डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर ४५.४ डिग्री सेल्सिअस, वर्धा ४५.५ डिग्री सेल्सिअस राहिले. एकूणच विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले आहे.
हवामान विभागाने शुक्रवार २६ एप्रिलपासून नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ची परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. जेव्हा तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअसच्या वर जाते तेव्हा उन लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभाग ऑरेंज अलर्ट जारी करीत असतो. २९ एप्रिलपर्यंत अलर्टची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान उष्ण हवेचे वारे वाहणार असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गुरुवार २५ तारखेला नोंदवण्यात आलेले विदर्भातील जिल्हानिहाय तापमान
जिल्हे तापमान
अकोला ४६.३ डिग्री सेल्सिअस
अमरावती ४५.० डिग्री सेल्सिअस
बुलडाणा ४२.५ डिग्री सेल्सिअस
ब्रह्मपुरी ४५.५ डिग्री सेल्सिअस
चंद्रपूर ४५.४ डिग्री सेल्सिअस
गडचिरोली ४३.० डिग्री सेल्सिअस
गोंदिया ३९.८ डिग्री सेल्सिअस
नागपूर ४४.३ डिग्री सेल्सिअस
वर्धा ४५.५ डिग्री सेल्सिअस
वाशीम ४३.८ डिग्री सेल्सिअस
यवतमाळ ४४.४ डिग्री सेल्सिअस