उद्या रंगणार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार; अवघे काही तास शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 03:50 PM2022-03-26T15:50:32+5:302022-03-26T15:51:57+5:30

रविवारी (दि. २७) पहाटे ५ वाजता कस्तूरचंद पार्क येथील सुरू होणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी नागपूरकर धावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Nagpur ready for Lokmat Maha marathon event on Sunday | उद्या रंगणार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार; अवघे काही तास शिल्लक

उद्या रंगणार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार; अवघे काही तास शिल्लक

Next
ठळक मुद्देनागपूरकर सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित व मुख्य प्रायोजक ‘प्लास्टो टँक ॲण्ड पाईप’ आणि पॉवर्ड बाय ‘ग्लोकल स्क्वेअर’ प्रस्तुत विदर्भातील सर्वांत मोठ्या नागपूर महामॅरेथॉनला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. रविवारी (दि. २७) पहाटे ५ वाजता कस्तूरचंद पार्क येथील सुरू होणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी नागपूरकर धावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या महामॅरेथॉनसाठी नोंदणीची मुदत संपली आहे. आता बिब कलेक्शन एक्स्पोची उत्सुकता आहे. बिब एक्स्पो आज, शनिवारी (दि. २६) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत रामगोपाल माहेश्वरी सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, झांशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजित करण्यात येत आहे.

सर्व सहभागी स्पर्धकांना महामॅरेथानमध्ये धावण्यासाठी बिब, गुडी बॅग आणि टी-शर्ट दिले जातील. रेसर किट घेण्यासाठी नोंदणी ई-मेल, एसएमएस, पावती आणि फोटो ओळखपत्र आवश्यक राहील. तुमच्या तर्फे तुमचे प्रतिनिधी देखील किट घेऊ शकतील, त्यासाठी तुमची स्वाक्षरी असलेले अधिकृत पत्र तसेच सोबत ओळखपत्राची प्रत आणि ई-मेल नोंदणी प्रत असणे आवश्यक आहे.

धावपटूंना होणार मार्गदर्शन

बिब एक्सपोमध्ये हेल्थकेअर पार्टनर किंग्जवे हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. सीमा अग्रवाल, फिजिओथेरपिस्ट डॉ. अमृता पॉल आणि क्रीडा वैद्यकतज्ज्ञ डॉ. रोहन बन्सल हे धावपटूंना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय रिलॅक्स झीलचे संजय पाटील यांचेही मार्गदर्शन होईल. यावेळी धावपटूंना पेसर्सची ओळख करून दिली जाईल. शिवाय मनोरंजनाची मेजवानी असेल.

रेसच्या मार्गात पाण्याची व्यवस्था

- २१ किमी मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंनी पहाटे पाच वाजता एकत्र यायचे आहे. ५.१५ ला पेसर्सची ओळख करून दिली जाईल शिवाय धावण्याचा मार्ग बिब, समजावून सांगण्यात येणार आहे. ५.३० ला वॉर्मअप होईल. त्यानंतर ५.४५ ला तील. शर्यत सुरू करण्यात येईल.

- १० किमी शर्यत सकाळी ६ वाजता सुरू करण्यात येईल. त्यानंतर ५ आणि ३ किमी अंतरांच्या शर्यतीना क्रमश: ७.३० आणि ७ वाजून ४० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

- धावण्याच्या मार्गात आयोजकांकडून ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उकाडा आणि उष्णता लक्षात घेता धावपटूंनी भरपूर पाणी प्यावे, असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.

- संपूर्ण मार्गात विविध प्रकारचे मनोरंजन आणि धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांची उपस्थिती राहील. धावण्याच्या मार्गात कुठलाही अडथळा न आणता धावपटूंसाठी मार्ग मोकळा करून द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘लोकमत’ महामॅरेथॉनचा मी आधीपासून फॉलोअर आहे. धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी प्रत्येकाने दररोज चालणे धावणे, सायकलिंग, योग क्रिया किंवा पोहणे आवश्यक आहे. शरीराकडे दुर्लक्ष झाल्यास व्याधींना आमंत्रण मिळते. कोरोना महामारीतून निघालेल्या सर्वांनी महामॅरेथॉनच्या माध्यमातून स्वत:चे फिटनेस जाणून घ्यावे. धावण्यामुळे पुढे जाण्याची प्रेरणा लाभते. वय केवळ आकडा आहे. सुरुवातीला ती किमी धावाल तर पुढे पाच आणि दहा किमी धावण्याचा विश्वास प्राप्त होऊ शकतो. मी गेली २५ वर्षे योगासने आणि पोहण्यासोबतच धावण्याचा व्यायाम करतो. हा माझ्या ध्यास आहे. मी स्वत: धावणार असून, महामॅरेथॉनमध्ये आपणही सहभागी व्हायला हवे.

-जगदीश भय्या, प्रकल्प संचालक, माहेश्वरी युवक संघ

Web Title: Nagpur ready for Lokmat Maha marathon event on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.