नागपुरात ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:07 AM2021-03-19T04:07:28+5:302021-03-19T04:07:28+5:30
नागपूर : नागपुरात आज सकाळी पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात ...
नागपूर : नागपुरात आज सकाळी पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून, तापमानही खालावले होते. दुपारनंतर मात्र पाऊस गायब झाला. सकाळी ८ वाजताच्या नोंदीनुसार नागपुरात ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही किरकोळ पावसाची नोंद झाली. कामठी तालुक्यातसह काही गावांमध्ये तसेच जलालखेडा तालुक्यात जलालखेडा आणि मेंढला येथे चांगला पाऊस झाला. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांचे चांगलेच नुकसान झाले.
विदर्भातही सकाळेच्या सुमारास वातावरण बदलले होते. वेधशाळेने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून, १९ तारखेला वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे.