नागपूरला 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज' पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 08:00 AM2022-01-18T08:00:00+5:302022-01-18T08:00:07+5:30

Nagpur News केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज'च्या पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. यात देशातील नागपूरसह ११ प्रमुख शहरांचा समावेश आहे.

Nagpur receives 'Street for People Challenge' award | नागपूरला 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज' पुरस्कार

नागपूरला 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज' पुरस्कार

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने घोषणा केलेल्या ११ शहरात नागपूरचा समावेश

नागपूर : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज'च्या पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. यात देशातील नागपूरसह ११ प्रमुख शहरांचा समावेश आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडला 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज' अंतर्गत पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच स्मार्ट सिटीला सोबतच ५० लाख रुपयांचा पुरस्कार घोषित केला आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयांचे सचिव मनोज जोशी यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा केली. कार्यक्रमात देशातील सर्व स्मार्ट सिटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. सहभागी झालेल्या होत्या.

स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज' उपक्रम १०० स्मार्ट सिटीसाठी राबविण्यात आला होता. यामधून सुरुवातील ३८ शहरांची निवड करण्यात आली होती. आता नागपूरचा पहिल्या ११ शहरांमध्ये समावेेश करण्यात आला आहे. सोबतच ५० लाख रुपयाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यापूर्वी नागपूर स्मार्ट सिटीची 'इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज'अंतर्गत निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत नागपूरला एक कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला होता, अशी माहिती भुवनेश्वरी एस. यांनी दिली. स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागाच्या प्रभारी व्यवस्थापक व नोडल अधिकारी डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

बाजारपेठांना शिस्त लावण्याचा प्रयत्न

स्टेक होल्डर्स सोबत बैठक घेऊन 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज'ची संकल्पना करण्यात आली. नागपूर स्मार्ट सिटी तर्फे सीताबर्डी आणि सक्करदरा भागाची निवड करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या बाजारपेठेला शिस्त लावण्याचा तसेच ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण राखण्याचा प्रयत्न करणार आहे. स्मार्ट सिटीच्या सर्वेक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी बाजारात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्मार्ट सिटीच्या चमूचे कौतुक केले आहे.

Web Title: Nagpur receives 'Street for People Challenge' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.