नागपूर आरटीओने वसूल केले ३४२ कोटी        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:57 PM2018-04-10T19:57:54+5:302018-04-10T19:58:11+5:30

राज्य शासनाला अनेक वर्षांपासून १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल देणारे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चक्क गोदामात सुरू आहे. सोयींचा अभाव व अल्प मनुष्यबळ असतानाही दिलेल्या लक्ष्याच्यावर जाऊन म्हणजे ११७ टक्के लक्ष्य  (टार्गेट) गाठले. शासनाने गेल्या आर्थिक वर्षात २९३.९१ कोटींचे लक्ष्य दिले होते, कार्यालयाने विशेष परिश्रम घेत शासनाच्या तिजोरीत ३४२.५५ कोटी रुपये जमा केले.

Nagpur RTO has recovered Rs. 342 crores | नागपूर आरटीओने वसूल केले ३४२ कोटी        

नागपूर आरटीओने वसूल केले ३४२ कोटी        

Next
ठळक मुद्देलक्ष्य होते २९३.९१ कोटींचे :  सोयींचा अभाव व कमी मनुष्यबळातही ११७ टक्के लक्ष्य पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राज्य शासनाला अनेक वर्षांपासून १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल देणारे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चक्क गोदामात सुरू आहे. सोयींचा अभाव व अल्प मनुष्यबळ असतानाही दिलेल्या लक्ष्याच्यावर जाऊन म्हणजे ११७ टक्के लक्ष्य  (टार्गेट) गाठले. शासनाने गेल्या आर्थिक वर्षात २९३.९१ कोटींचे लक्ष्य दिले होते, कार्यालयाने विशेष परिश्रम घेत शासनाच्या तिजोरीत ३४२.५५ कोटी रुपये जमा केले.
  कामठी मार्गावरील अन्न विभागाच्या लाल गोदामात गेल्या १० वर्षांपासून या आरटीओचे कामकाज सुरू आहे. गोदामच असल्याने येथे कुठल्याच सुविधा नाहीत. पिण्याचे पाणी किंवा लघुशंकेचीसुद्धा सोय नाही. स्वतंत्र इमारतीसाठी पहिल्यांदा २०१० साली शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र तीन वर्षे काहीच झाले नाही. २०१४ मध्ये स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. परंतु आता चार वर्षे होत असतानाही इमारतीचे बांधकामच सुरूच आहे. यामुळे आजही गोदामातच कार्यालय सुरू आहे. विशेष म्हणजे नागपूर ग्रामीणसह गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा आरटीओ कार्यालयाचा भारही या कार्यालयावर आहे. नागपूर विभागात दिवसाला सुमारे ३०० नवीन वाहनांची नोंद होते. यातील सर्वाधिक वाहनांची नोंद नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात होते.  वर्षभरात साधारण पाच लाख वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे आरटीओच्या कामाचा प्रचंड व्याप वाढला आहे. मात्र, त्यातुलनेत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या फारच अल्प आहे. अनेक वर्षांत रिक्त झालेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. परिणामी, याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसत आहे. कठीण परिस्थितीतही लक्ष्यापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याने अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांना याचे श्रेय देण्यात आले आहे.

 नागपूर ग्रामीण विभाग आरटीओअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांची स्थिती

कार्यालयाचे नाव     वार्षिक उद्दिष्ट        पूर्तता          टक्केवारी 
नागपूर ग्रामीण         १२६.४९ कोटी    १४४.३० कोटी    ११७ 
गडचिरोली               १८.३४ कोटी      २३.३३ कोटी    १२७ 

    चंद्रपूर                 ३८.०४ कोटी         ४२.१७ कोटी   १११

 
    गोंदिया                ८४.६२ कोटी        ९७.३८ कोटी   ११५ 
    भंडारा                 २६.०६ कोटी          ३०.८२ कोटी   ११८ 

एकूण (नागपूर विभाग)  २९३.९१ कोटी  ३४२.५५ कोटी  ११७

विशेष नियोजनामुळे लक्ष्य गाठता आले
अवघड परिस्थीती असतानाही अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतल्याने व विशेष नियोजन केल्याने  शासनाने दिलेले ११७ टक्के लक्ष्य पूर्ण करता आले. 
-श्रीपाद वाडेकर
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण 

Web Title: Nagpur RTO has recovered Rs. 342 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.