नागपूर ग्रामीण पोलिसांची ११२ स्कूल बस व वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:11 PM2017-12-05T22:11:22+5:302017-12-05T22:15:12+5:30

नागपूर जिल्हा (ग्रामीण) वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मंगळवारी २०० वाहनांची तपासणी केली. यात दोषी आढळून आलेल्या ११२ स्कूल बस व स्कूल व्हॅनवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६६ हजार रुपयांचा दंडही वसूल केला.

Nagpur rural police has taken action against 112 school buses and vehicles | नागपूर ग्रामीण पोलिसांची ११२ स्कूल बस व वाहनांवर कारवाई

नागपूर ग्रामीण पोलिसांची ११२ स्कूल बस व वाहनांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे६६ हजार रुपयांचा ठोठवला दंड

ऑनलाईन लोकमत 

नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत. परंतु काही स्कूल बस व स्कूल व्हॅनचालक नियम धाब्यावर बसून विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात घालतात. याला आळा घालण्यासाठी नागपूर जिल्हा (ग्रामीण) वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मंगळवारी २०० वाहनांची तपासणी केली. यात दोषी आढळून आलेल्या ११२ स्कूल बस व स्कूल व्हॅनवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६६ हजार रुपयांचा दंडही वसूल केला.
राज्य शासनाने स्कूल बसबाबत लागू केलेल्या नियमावलीमध्ये विद्यार्थी वाहतुकीसाठी अत्यंत काटेकोर नियम केले आहेत. नियमावलीनुसार संबंधिताची स्कूल बस आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी शालेय पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत समित्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. याला गंभीरतेने घेत नागपूर ग्रामीण पोलीसचे अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत व पोलीस उपअधीक्षक कैलास गावंडे यांच्या दिशानिर्देशानुसार मंगळवारी २०० स्कूल बस व स्कूल व्हॅनची तपासणी करण्यात आली. खापरखेडा, सावनेर, केळवदच्या हद्दीत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ११२ वाहनांवर संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक ए.बी. शेख, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सतीश सोनटक्के आदींचा सहभाग होता.
शहरातही कारवाई होणार
शहराच्या हद्दीत वेगाने धावणाºया स्कूल बस व स्कूल व्हॅनची तपासणीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. यात मूळ वाहतुकीतून बाद झालेल्या आणि विद्यार्थी वाहतुकीचा कोणताही परवाना नसलेल्या वाहनांतून विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असेल तर अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
-शरद जिचकार
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

Web Title: Nagpur rural police has taken action against 112 school buses and vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.