'पंचायत राज'चे धडे गिरविण्यासाठी नागपूरचे सरपंच गुजरातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:46 PM2020-01-22T23:46:25+5:302020-01-22T23:47:31+5:30
पंचायत राज व्यवस्थेचे धडे गिरविण्यासाठी जिल्ह्यातील १३ गावांचे सरपंच गुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी बुधवारी नागपूरहून गुजरात येथे रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : पंचायत राज व्यवस्थेचे धडे गिरविण्यासाठी जिल्ह्यातील १३ गावांचे सरपंचगुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी बुधवारी नागपूरहून गुजरात येथे रवाना झाले. राज्य सरकार, यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिह्यातील १३ सरपंच, कुही येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि अभ्यास दौऱ्याचे जिल्हा समन्वयक वामन आत्राम गुजरात राज्यातील अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी नागपूर येथून रवाना झाले.
सदर प्रशिक्षणामध्ये गुजराज राज्यातील यशस्वी पंचायत राज व्यवस्था, ई-ग्रामपंचायत, प्रशासकीय कारभार, बचत गट, कुटीर उद्योग, ग्रामसभा या गाव विकासाच्या दृष्टीने अभ्यास करण्याकरिता राज्यस्तरावर शासकीय दौºयाकरिता नागपूर जिल्ह्यातून या दौऱ्यात सरपंच पत्रूजी ताजणे, धापर्ला (भिवापूर), सरपंच नलिनी शेरकुरे, पिपळधरा (हिंगणा), सरपंच दिलीप डाखोळे, वरोडा (कळमेश्वर), सरपंच भावना चांभारे, आडका (कामठी), सरपंच सुधीर गोतमारे, खुर्सापार (काटोल), सरपंच गजानन धांडे, आकोली(कुही),सरपंच भुमेश्वर चाफले नंदापुरी (मौदा), सरपंच धनश्री ढोमणे, फेटरी(नागपूर), सरपंच उषा फुके, येणीकोणी (नरखेड), सरपंच नरेश ढोणे, बखारी (पारशिवनी), सरपंच रामचंद्र अडमाची,बांद्रा (रामटेक), सरपंच अन्नपूर्णा डहाके, वाकी (सावनेर), सरपंच योगिता मानकर, वायगाव (उमरेड) यांची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.