नागपूर - सावनेर मार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:09 PM2018-04-20T23:09:30+5:302018-04-20T23:09:39+5:30

भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाला.

On Nagpur-Savner road Three people died in a serious accident | नागपूर - सावनेर मार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

नागपूर - सावनेर मार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमृतात पती-पत्नीचा समावेशपाटणसावंगीजवळ कारची दुचाकीला धडक, दोघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाला.
धनराज रघुनाथ विश्वकर्मा (५०, रा. देवीनगर, वाठोडा, नागपूर) आणि सुनीता धनराज विश्वकर्मा (४४) असे मृत पती-पत्नीचे तर राजेश ऊर्फ राजू तिवारी, रा. होशंगाबाद असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमींमध्ये किशोर इंगळे (३४, रा. मूर्तिजापूर) आणि यास्मिन शेख बन्नू (३२, रा. नागपूर) या दोघांचा समावेश आहे.
सुनीता यांच्या मोठ्या भावाच्या मुलीचे मुलताई येथे गुरुवारी लग्न होते. त्यासाठी धनराज आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघेही एमएच-४९/एएफ -०७८७ क्रमांकाच्या मोटरसायकलने मुलताई येथे बुधवारी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते दोघेही मुलताई येथून नागपूरला परत येत होते. त्याचवेळी एमपी-०४/टीबी-०९७१ क्रमांकाच्या कारने किशोर इंगळे, यास्मिन हे येत होते. पाटणसावंगी टोलनाक्याजवळ या भरधाव कारने धनराज यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली. अपघातामुळे कार अनियंत्रित होऊन पुलाच्या भिंतीवर आदळली. या अपघातात मोटरसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक राजूसह किशोर आणि यास्मिन असे तिघे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. कारमधील तिन्ही जखमींना अ‍ॅम्बुलन्सने मेयोकडे रवाना केले. तेथे उपचार सुरू असताना कारचालक राजीवचा मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.
मृत धनराज यांचे नागुपरातील आशीर्वादनगरात इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. तर यास्मिन ही लग्नसमारंभ, कार्यक्रम घेणे यासारखे इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करतात. अशाचप्रकारे छिंदवाडा येथे लग्न समारंभाची पूर्ण जबाबदारी पार पाडून ते नागपूरकडे येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
जखमींवर उपचार
या अपघातात जखमी झालेली यास्मिन ही इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते तर किशोर हा मूर्तिजापूर येथेच एका औषध कंपनीत सुपरवायजर म्हणून काम करतो. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने तो नेहमी बाहेरगावी जात असतो. अशाप्रकारे तो छिंदवाडा येथे गेला. तेथे त्याची मैत्रीण यास्मिनसोबत भेट झाली. दोघांनाही नागपुरात यायचे असल्याने त्यांनी खाजगी कार किरायाने करून नागपूरसाठी यायला निघाले, अशी माहिती त्याने पोलीस बयाणात दिली. दोन्ही जखमींवर नागपुरातील वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

Web Title: On Nagpur-Savner road Three people died in a serious accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.