नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 09:45 PM2018-03-08T21:45:24+5:302018-03-08T21:45:24+5:30

ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़

Nagpur Senior Journalist Anil Mahatme passed away |  नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन

 नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शोकसंवेदना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़ त्यांच्यामागे पत्नी डा़ॅ आसावरी महात्मे, मुलगा अभिनंदन, दोन मुली अनुभूती व डॉ. प्रज्ञा देवव्रत बेगडे आणि नातवंडासह मोठा आप्तपरिवार आहे़
दिवंगत महात्मे हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी होते़ त्यांनी नागपुरातील महासागर या दैनिकातून पत्रकारितेला सुरवात केली़ ते नागपूर पत्रिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होते़ त्यानंतर निर्मल महाराष्ट्र, जनवाद आणि सकाळमध्ये काम केले़ मध्यंतरी त्यांनी दखल नावाचे साप्ताहिकही चालविले़ त्यांनी आपल्या कारकिर्दीत कृषी पत्रकारितेला नवा आयाम दिला़ त्यांना कृषी मित्र पुरस्कार प्राप्त झाला होता़ साठी ओलांडल्यानंतरही त्यांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही़ दोन वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केली़ त्यांनी कृषी संपदा, रायटरमध्येही काम केले़ अनेक संस्था संघटनांसह नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी राहिलेत़
पत्रकार सहनिवास, महाराजबाग या निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघाली व अंबाझरी घाटावर विद्युत शवदाहिनीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजित देशमुख होते़ यावेळी डॉ़ शरद निंबाळकर, तानाजी वनवे, रमेश गजबे, जैन समाजाचे मारोतकर, विजय जावंधिया, प्रा़ शरद पाटील, शरद चौधरी, तुषार कोहळे, विनोद देशमुख, खान नायडू, विलास कालेकर, प्रा़ भाऊ भोगे, श्रीनिवास खांदेवाले, दिलीप गोडे, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, श्रीपाद अपराजित, भास्कर लोंढे, दिलीप तिखिले यांची उपस्थिती होती़ यावेळी इंडियन मीडिया जर्नालिस्टचे बाला भास्कर आणि इंडियन फेडरेशन आॅफ वर्कींग जर्नालिस्टचे विक्रम राव यांनी भ्रमणध्वनीवरून शोकसंवेदना व्यक्त केल्या़ शोकसभेचे संचालन प्रा़ जवाहर चरडे यांनी केले़
मुख्यमंत्री यांच्या शोकसंवेदना
अनिल महात्मे यांनी पत्रकारितेत दिलेले योगदान मोलाचे आहे. एक साक्षेपी संपादक आणि व्यासंगी लेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली.

 

 

Web Title: Nagpur Senior Journalist Anil Mahatme passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.