नागपूर-शहडोल-नागपूर एक्सप्रेस आठ दिवसांसाठी रद्द
By नरेश डोंगरे | Published: June 11, 2024 08:24 PM2024-06-11T20:24:17+5:302024-06-11T20:24:23+5:30
नागपूर-शहडोल एक्सप्रेस १२ जून ते २० जून पर्यंत रद्द करण्यात आली.
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात केल्या जाणाऱ्या नॉन इंटरलॉकिंग वर्कमुळे ११२०१/११२०२ नागपूर- शहडोल- नागपूर या दोन गाड्या आज बुधवारपासून एका आठवड्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (दपूमरे)च्या बिलासपूर विभागातील अनूपपूर जंक्शन ते न्यू कटनी जंक्शनमधील मुदरिया येथे थर्ड लाईन कनेक्टिव्हिटीचे काम सुरू आहे. त्यामुळे नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्याचे ठरले आहे.
परिणामी या मार्गावरून धावणारी ११.२०१ नागपूर-शहडोल एक्सप्रेस १२ जून ते २० जून पर्यंत रद्द करण्यात आली. अशाच प्रकारे ११२०२ शहडोल-नागपूर एक्सप्रेस १३ जूनपासून २१ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना भविष्यात अधिक चांगली सेवा देण्यासाठी हे काम करण्यात येत आहे, त्यामुळे गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.