नागपूर शारजाह विमान २४ सप्टेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 01:03 AM2020-09-01T01:03:35+5:302020-09-01T01:07:10+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मागील सहा महिन्यापासून बंद होते. परंतु १४ सप्टेंबरपासून नागपूर ते शारजाह हे विमान सुरू होत आहे. हे विमान एअर अरेबियाच्या सिस्टीमवर उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मागील सहा महिन्यापासून बंद होते. परंतु १४ सप्टेंबरपासून नागपूर ते शारजाह हे विमान सुरू होत आहे. हे विमान एअर अरेबियाच्या सिस्टीमवर उपलब्ध आहे.
एअर अरेबियाचे विमान जी ९ - ४१५ सोमवारी आणि बुधवारी पहाटे ४.५० वाजता असणार आहे. जी ९ -४१६ शारजाह- नागपूर विमानाचे आगमन मंगळवारी आणि रविवारी पहाटे ४.१० वाजता होईल. या विमानासाठी गाईडलाईन ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाहेरील देशातून येणाऱ्यांसाठी रेसिडेंट व्हिसा, वर्क परमिट होल्डर आणि भारतीय नागरिक व्हॅलिड टुरिस्ट किंवा व्हिजिट व्हिसावर प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांना ttp://uaeentry.ica.gov.ae यावर यूएई रेसिडेंट व्हिसाची नोंद करावी लागणार आहे. आपले फ्लाईट बुक करण्याआधी तपासावी लागेल. आरटी पीसीआर टेस्ट ९६ तास इमिग्रेशन क्लीअरन्ससाठी आवश्यक राहील. सर्व प्रवाशांना आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. प्रवाशांना आपला विमाही काढावा लागणार आहे. यासाठी अजून डीजीसीएची परवानगी मिळणे बाकी आहे.
कोलकातासाठी आजपासून विमान
लॉकडाऊन बंद असलेले नागपूर कोलकाता विमान मंगळवारपासून सुरू होत आहे. फ्लाईट ६ ई ४०४/४०३ कोलकाता नागपूर कोलकाताचे आगमन सायंकाळी ७.२५ वाजता होईल. हे विमान रात्री ८.०५ वाजता रवाना होईल. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारपासून नागपूर इंदूर नागपूर हे विमानही सुरू होत आहे.