नागपूर-शेगाव पायदळ पालखी यात्रा १ ऑगस्टपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:26 AM2019-07-23T11:26:20+5:302019-07-23T11:26:51+5:30
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, टिमकीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबेची राखी घेऊन नागपूर ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारीचे आयोजन १ ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री संत गजानन महाराज सेवा समिती, टिमकीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबेची राखी घेऊन नागपूर ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारीचे आयोजन १ ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.
श्री गजानन महाराजांच्या पायदळ पालखीचे प्रस्थान गुरुवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक येथून होईल.
या वारीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांना आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचे असून, नोंदणीस सुरुवात झाली आहे. २५ जुलैपर्यंत भक्तांनी आपल्या नावाची नोंदणी समितीचे कार्यालय ‘दिलासा’, ५१, नाथ-गजानन अपार्टमेंट, साईद्वार, दारोडकर चौक येथे किंवा दास अनुप, श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजतापर्यंत करण्याचे आवाहन समितीचे प्रचार प्रमुख श्याम गडवे यांनी केले आहे.