नागपूर शायनिंग

By admin | Published: March 19, 2017 02:52 AM2017-03-19T02:52:40+5:302017-03-19T02:52:40+5:30

अर्थसंकल्पात मिहानकरिता १०० कोटी आणि नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची घोषणा करताना

Nagpur Shining | नागपूर शायनिंग

नागपूर शायनिंग

Next

मिहानसाठी १०० कोटी
नागपूर : अर्थसंकल्पात मिहानकरिता १०० कोटी आणि नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची घोषणा करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर शायनिंगचा नारा दिला आहे. अर्थसंकल्पात नागपूर, मुंबई आणि पुणे येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ७१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ७१० कोटींपैकी नागपूर मेट्रो प्रकल्पालाही निधी मिळेल. मिहानला १०० कोटी रुपये मिळाले आहे. यातून पायाभूत सुविधा आणि अन्य कामे होणार आहेत. हा निधी कुठे खर्च करायचा, हे सर्वस्वी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) चेअरमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, अशी प्रतिक्रिया ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. हा निधी पुनर्वसन आणि विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) वित्त संचालक एस. शिवमाथन म्हणाले, महामेट्रो नागपूर आणि पुणे येथे प्रकल्प उभारत आहे. यावर्षी या प्रकल्पांसाठी २७०० कोटींची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने १८५० कोटींची तरतूद केली आहे. यापैकी ९५० कोटी नागपूर मेट्रो आणि ९५० कोटी पुणे मेट्रोला मिळतील.(प्रतिनिधी)

 

Web Title: Nagpur Shining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.