नागपूर परत हादरले, शुल्लक वादातून साळ्याकडून कामगार जावयाची हत्या

By योगेश पांडे | Published: March 12, 2024 04:25 PM2024-03-12T16:25:42+5:302024-03-12T16:26:09+5:30

बेलतरोडीतील घटना : आरोपी व मृतक दोघेही मध्यप्रदेशमधील

Nagpur shook again, worker's son-in-law was killed by Sala due to fee dispute | नागपूर परत हादरले, शुल्लक वादातून साळ्याकडून कामगार जावयाची हत्या

नागपूर परत हादरले, शुल्लक वादातून साळ्याकडून कामगार जावयाची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुल्लक वादातून साळ्याने एका कंस्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या कामगार जावयाची लाकडी दांड्याने प्रहार करत हत्या केली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपी व मृतक दोघेही मध्यप्रदेशमधील आहेत.

रवी गलिचंद कहार (३०, हरई, छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. तर अरुण अन्नू बनवारी (२४, लिंगा, छिंदवाडा, मध्यप्रदेश) हा आरोपी साळा आहे. रवी हा त्याच्या दोन भाऊ, पत्नी, सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांच्या मुलासोबत नागपुरात कामाला आला होता. हे सर्व लोक रचना गृह निर्माण सहकारी संस्था, शिवणगाव, पुनर्वसन ले आऊट येथे गटार पाईप लाईन मजुरीचे काम करत होते. ते तेथेच कच्चे घर बांधून राहत होते. काही दिवसांअगोदर त्याचा लहान भाऊ श्याम व जावई अंकित हे बैद्यनाथ चौकातील साईटवर कामासाठी गेले व तेथेच रहायला लागले. तर पत्नी निशा ही दोन आठवड्यांअगोदर महाशिवरात्रीसाठी गावाला गेली. त्यामुळे रवी व अरुण हे दोघेच कच्च्या घरात राहत होते.

सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघांमध्ये शुल्लक गोष्टीवरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर अरुणने रवीच्या तोंड व डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी अरुण हा घटनास्थळावरून फरार झाला. परिसरातील मजुरांनी रवीचा भाऊ श्यामला फोन करून या घटनेची माहिती दिली. श्याम घटनास्थळी पोहोचला असता रवी रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता व रक्ताने माखलेला लाकडी दांडा बाजुलाच पडला होता. रवीवर अरुणने वार केल्याची माहिती जवळच काम करणाऱ्या एका मजुराने दिली. श्यामने पोलिसांना माहिती दिली. श्यामच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अरुणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Nagpur shook again, worker's son-in-law was killed by Sala due to fee dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.