नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 08:53 PM2018-01-03T20:53:07+5:302018-01-03T20:55:28+5:30

बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली.

In Nagpur, the shops and emergency arrangements of drugs have opened | नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू

नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू

Next
ठळक मुद्देबंद काळात आंबेडकरी कार्यकर्त्यांची माणुसकी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली. सीताबर्डीचे सर्व मार्केट बंद करण्यात आले, परंतु येथे असलेले औषधाचे दुकान बंद होऊ दिले नाही. दुसरीकडे मेडिकल चौकातील सर्वच्या सर्व मेडिकल शॉप दिवसभर सुरळीत सुरू ठेवण्यात आले. रुग्णालये आणि इतर वैद्यकीय प्रतिष्ठानांनाही कुठलाही त्रास कार्यकर्त्यांनी होऊ दिला नाही.
कार्यकर्त्यांनी दमदाटी करून बंद ठेवण्याची सूचना केली व इशाराही दिला. कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे व्यावसायिकांनी  आपली दुकाने बंद केली. मेडिकल चौकात कार्यकर्त्यांची रॅली निघल्यानंतर भीतीमुळे दुकाने बंद करण्यात येत होती. यावेळी मेडिकल शॉप चालकांनीही भीतीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले. औषधांची दुकाने सुरू राहू द्या असे सांगितले. मेडिकल चौकात दारूचे दुकान बंद करताना शेजारचे मेडिकल शॉप सुरळीत सुरू होते. सीताबर्डी मार्केट परिसरातही असाच अनुभव आला. शेकडो कार्यकर्ते मार्केटमध्ये घुसले व घोषणा देत सुरू असलेली दुकाने बंद केली. परंतु येथे असलेली फार्मसी मात्र याला अपवाद ठरली. त्यामुळे सर्व मार्केट बंद असताना येथे असलेले औषधाचे दुकान मात्र सुरू राहू देण्यात आले. तुकडोजी चौकात सुपर हॉस्पिटलसमोरील औषधीचे दुकानेही कार्यकर्त्यांनी सुरू राहू दिली. शहरात ठिकठिकाणी हाच अनुभव येत होता. सर्व रुग्णालये आणि आपत्कालीन व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहतील याची काळजी घेतली.

 

Web Title: In Nagpur, the shops and emergency arrangements of drugs have opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.