नागपूर हे ‘जॉर्इंट रिप्लेसमेंटचे’ मुख्य केंद्र व्हावे
By admin | Published: September 13, 2015 03:00 AM2015-09-13T03:00:24+5:302015-09-13T03:00:24+5:30
नागपूर हे मध्य भारतातील एक आरोग्य केंद्र्र म्हणून उदयास आले आहे. आता ते ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’चे मुख्य केंद्र व्हावे, ...
नागपूर आॅर्थ्रोप्लास्टी परिषदेला प्रारंभ : सुधीर बाभुळकर यांचे प्रतिपादन
नागपूर : नागपूर हे मध्य भारतातील एक आरोग्य केंद्र्र म्हणून उदयास आले आहे. आता ते ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’चे मुख्य केंद्र व्हावे, अशी अपेक्षा डॉ. सुधीर बाभुळकर यांनी येथे व्यक्त केली. विदर्भ आॅर्थोपेडिक सोसायटीच्यावतीने पहिल्या नागपूर आॅर्थ्रोप्लास्टी (कोर्स) परिषदेला शनिवारपासून रामदासपेठ येथील एका हॉटेलात प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटक म्हणून डॉ. बाभुळकर बोलत होते. याप्रसंगी डॉ. हरगुन संगतांनी, डॉ. उमेश महाजन, परिषदेच्या आॅर्गनायझर कमिटीचे डॉ. मुकेश लढ्ढा, डॉ. तुषार भुरे, डॉ. आलोक उमरे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. बाभुळकर म्हणाले. नागपुरात या प्रकारची परिषद पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील आॅर्थोपेडिक सर्जनने याचा चांगला लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विदर्भ आॅर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष आपटे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव डॉ. अमोल कडू यांनी आभार मानले.
शनिवारी पहिल्या दिवशी अनेक सत्र पार पडले. या विविध सत्रामध्ये डॉ. अविनाश पाटील, डॉ. जितेंद्र टावरी, डॉ. समीर देशमुख, डॉ. संजय सोनवणे, डॉ. सुनील निकोसे, डॉ. सुहास सिंग, डॉ. हरगुन संगतानी, डॉ. आनंद नानू, डॉ. मकवाना, डॉ. अशोक लवंगे, डॉ. नीलेश जोशी, डॉ. सुश्रुत बाभुळकर, डॉ. अलंकार रामटेके, डॉ. अभय पाटील, डॉ. के. एस. राजन, डॉ. राजू चौधरी, डॉ. सुशील मानकर, डॉ. गोविंद लाहोटी, डॉ. योगेश सालफळे, डॉ देवाशिष बेरीक, डॉ. मनोज पहुरकर, डॉ. हर्ष गिडवानी, डॉ. अमिष क्षत्रिय या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)