नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्मार्ट सिटीच्या ‘कोविड बेड’ ॲपला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 02:25 PM2022-09-03T14:25:19+5:302022-09-03T14:32:51+5:30

कोविड महामारीत ॲपमुळे बेड मिळाले : चिन्मय गोतमारे यांनी स्वीकारला पुरस्कार

Nagpur Smart City gets national award for smart project 'covid bed app' | नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्मार्ट सिटीच्या ‘कोविड बेड’ ॲपला राष्ट्रीय पुरस्कार

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्मार्ट सिटीच्या ‘कोविड बेड’ ॲपला राष्ट्रीय पुरस्कार

Next

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडने कोरोना महामारीच्या दरम्यान कोविड बेडच्या संदर्भात अद्ययावत माहिती देणारे ‘कोविड बेड’ ॲप्लिकेशन तयार केले होते. यामुळे रुग्णांना सुविधा झाली होती. यासाठी स्मार्ट सिटीला कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मुंबई येथे कार्यक्रमात नागपूर स्मार्ट सिटीला राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी स्मार्ट सिटीच्या वतीने पुरस्कार स्वीकारले.

स्मार्ट सिटीज कौन्सिल ऑफ इंडियातर्फे स्मार्ट अर्बनेशन कार्यक्रम नुकताच मुंबई येथे झाला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशातील वेगवेगळ्या स्मार्ट सिटींना स्मार्ट प्रोजेक्ट अवॉर्ड देण्यात आले. देशातील ३३ शहरांनी यात सहभाग घेतला.

नागपूर स्मार्ट सिटीद्वारे कोविड महामारी दरम्यान तयार केलेल्या ॲप्लिकेशनचा नागरिकांना फायदा झाला. रुग्णांना बेड्स मिळत नव्हते तेव्हा कोविड बेड ॲप्लिकेशनचा वापर करून गरजूंना खासगी आणि शासकीय रुग्णालयात बेड्सची माहिती सहज उपलब्ध झाली. या ॲप्लिकेशनद्वारे डॅशबोर्ड, अद्ययावत खाटांची संख्या, ऑक्सिजन, आय.सी.यू. आणि व्हेंटिलेटरची माहिती मिळण्यास मदत झाली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात वॉररूम स्थापन करण्यात आले होते. कोविड महामारीमध्ये नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्याला महत्त्व देण्यात आले होते. ॲप्लिकेशनचा नागरिकांना लाभ झाला. या कार्यक्रमात रि-थिंकिंग स्मार्ट मोबॅलिटी - दी न्यू मोबॅलिटी लँडस्केप विषयावर आयोजित चर्चासत्रात चिन्मय गोतमारे यांनी आपले विचार मांडले.

Web Title: Nagpur Smart City gets national award for smart project 'covid bed app'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.