नागपुरात  भरधाव कार दुभाजकावर धडकली, तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 10:24 PM2021-02-20T22:24:30+5:302021-02-20T22:26:22+5:30

Accident बाहेरगावच्या चुलत बहिणीला पार्टी देण्यासाठी गेलेल्या तरुणाची भरधाव कार दुभाजकावर आळल्याने कारमधील एका तरुणीचा मृत्यू झाला.

In Nagpur, a Speedy car hit a divider, killing a young woman | नागपुरात  भरधाव कार दुभाजकावर धडकली, तरुणी ठार

नागपुरात  भरधाव कार दुभाजकावर धडकली, तरुणी ठार

googlenewsNext
ठळक मुद्देभावासह तिघे गंभीर जखमी ,अंबाझरीत मध्यरात्री घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बाहेरगावच्या चुलत बहिणीला पार्टी देण्यासाठी गेलेल्या तरुणाची भरधाव कार दुभाजकावर आळल्याने कारमधील एका तरुणीचा मृत्यू झाला. बरखा हरिश खुराणा (वय २४) असे मृत तरुणीचे नाव असून अपघातात तिच्या भावासह तिघे गंभीर जखमी झाले. रवीनगर चौक ते लॉ कॉलेज चाैकादरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला.

शुक्रवारी तलावाजवळ सायकल स्टोअर्स चालविणाऱ्या खुराणा कुटुंबातील बरखा आणि लक्की हरिश खुराणा (वय २२) या बहिणभावांनी त्यांची रायपूर (छत्तीसगड) येथून आलेली चुलत बहिण रिया जगन्नाथ खुराणा (वय २३) हिला पार्टी देण्याचा शुक्रवारी बेत आखला. लक्कीचा काैटुंबिक मित्र प्रेम अशोक चंदनानी (वय २०, रा. शांतीनगर) याला सोबत घेऊन लक्की, बरखा आणि रिया शुक्रवारी रात्री स्वीफ्ट कारने (एमएच २८ - एएन १७२६) वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंडरवर्ल्ड या हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. मध्यरात्री १.३० च्या सुमारास ते नागपूरकडे परत येत असताना आरोपी प्रेम चंदणानी निष्काळजीपणे कार चालवू लागला. रवीनगर चाैकातून लॉ कॉलेज चौकाकडे येताना त्यांची भरधाव कार अनियंत्रीत होऊन दुभाजकावर एका बाजुने धडकत बराच अंतरपर्यंत खेटून घासत गेली. त्यामुळे कारचा एका बाजुचा चुराडा होऊन चाैघेही गंभीर जखमी झाले. त्यांना धंतोलीतील एका खासगी ईस्पितळात नेले असता डॉक्टरांनी बरखाला मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळाल्यानंतर अंबाझरी पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वाहतूकीस अडसर होऊ नये म्हणून अपघातग्रस्त कार दुसरीकडे हलविली आणि रुग्णालयात जखमीचे बयाण नोंदविले.

आरोपीला अटक अन् सुटका

जखमींच्या बयानावरून आरोपी प्रेम चंदनानी हा अत्यंत हलगर्जीपणाने आणि वेगात कार चालवित होता, असे स्पष्ट झाले. त्यामुळे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी त्याला अटक केली. त्यालाही अपघातात जखमा झाल्याच्या कारणावरून नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

Web Title: In Nagpur, a Speedy car hit a divider, killing a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.