नागपुरात भरधाव एसटी बसने तरुणाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:07 AM2018-04-12T00:07:41+5:302018-04-12T00:07:54+5:30

जगनाडे चौक, संग्राम बारसमोर मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका भरधाव एसटी बसने दुचाकी स्वार युवकास चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसला घेरले. त्यामुळे बस चालक बस सोडून पळाला.

In Nagpur, the ST bus crushed the youth | नागपुरात भरधाव एसटी बसने तरुणाला चिरडले

नागपुरात भरधाव एसटी बसने तरुणाला चिरडले

Next
ठळक मुद्देजगनाडे चौकातील घटना : चालक बस सोडून पळाला, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यानंतर नागरिकांनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांनुसार बस क्रमांक एमएच/४०/वाय/५६२५ नागपूरला येत होती. बस चालक कदाचित बस घेऊन वर्धमाननगर डेपोकडे जात असावा. बस अतिशय भरधाव होती. दरम्यान एका नवीन दुचाकीवर युवक नंदनवनकडे जात होता. त्याचवेळी मागून येत असलेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत होते.

Web Title: In Nagpur, the ST bus crushed the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.