नागपूर स्थायी समितीचा अर्थसंकल्प व्यर्थ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 12:27 PM2021-01-25T12:27:05+5:302021-01-25T12:28:16+5:30

Nagpur News कोरोनाकाळात सर्वच यंत्रणांचे आर्थिक गणित फसल्याने महापालिकेचा मागील वर्षीचा अर्थसंकल्पही मोडित निघाल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे.

Nagpur Standing Committee budget in vain? | नागपूर स्थायी समितीचा अर्थसंकल्प व्यर्थ?

नागपूर स्थायी समितीचा अर्थसंकल्प व्यर्थ?

Next
ठळक मुद्देमनपातील सत्ताधाऱ्यांची कोंडी पुढील वर्षात निवडणुकीला सामोरे कसे जाणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने प्रभागातील रखडलेल्या कामाकडे नगरसेवकांनी लक्ष केंद्रित केले आहे. परंतु कोरोनाकाळात सर्वच यंत्रणांचे आर्थिक गणित फसल्याने महापालिकेचा मागील वर्षीचा अर्थसंकल्पही मोडित निघाल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. अशा परिस्थितीत प्रभागातील अत्यावश्यक कामे झाली नाही तर निवडणुकीला सामोरे जायचे कसे असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.

स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी २०२०-२१ या वर्र्षाचा २,७३१ कोटीचा अर्थसंकल्प ऑक्टोबर महिन्यात दिला होता. विशेष म्हणजे झलके यांनी ४६६.६ कोटीने बजेट कमी दिले होते. लोकोपयोगी कामे, सिमेंट रोड, रस्ते दुरुस्ती व आवश्यक कामासाठी १२७.५२ कोटीची तरतूद केली होती. परंतु मार्च अखेरीस मनपा तिजोरीत १७०० कोटी जमा होण्याचा अंदाज असल्याने अत्यावश्यक कामांच्या निधीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५० टक्के कपात करून ६३.७५ कोटीची सुधारीत तरतूद केली आहे. यातून आवश्यक कामे शक्य नाही.

चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात २७३१ कोटींच्या जमा-खर्चाचे गणित मांडणाऱ्या महापालिकेच्या तिजोरीत डिसेंबरपर्यंत १३९३.२४ कोटीचा महसूल जमा झाला. आर्थिक वर्षाला आता जेमतेम सव्वादोन महिने शिल्लक असताना ही परिस्थिती असल्याने यंदाचा संकल्प ढासळण्याची शक्यता आहे. नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी प्रत्येकी २० लाखांची तरतुद असताना जेमतेम ४ ते ५ लाख मिळणार आहे. तसेही आर्थिक वर्षाला सव्वादोन महिनेच शिल्लक असल्याने हा निधी खर्च होईल की नाही याबाबत शंका आहे.

सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन कागदावरच

महापालिका निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्याने प्रभागांमधील विकासकामांसाठी भरघोस निधीच्या तरतुदींसाठी डोळे लावून बसलेल्या नगरसेवकांचे अपुऱ्या निधीमुळे तोंडचे पाणी पळाले आहे. स्थायी समिती सभेत धास्तावलेले नगरसेवक प्रभागातील कामे कशी करणार असा सवाल करीत आहेत. कोविडपूर्व काळात शहरात सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचा धडाका लावण्याचा बेतही येथील सत्ताधाऱ्यांनी आखला होता. मात्र महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा न झाल्याने नियोजन कागदावरच राहिले आहे.

नगरसेवकांत धास्ती

कोरोनाकाळामुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने आयुक्तांनी अत्यावश्यक कामासाठी ६३.७५ कोटीची सुधारीत तरतूद केली आहे.

वर्षभरावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांमधील कामांना पुरेसा निधी मिळत नसल्याची ओरड आता सुरू झाली आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याने महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रभागातील कामांसाठी भरघोस निधीचे नियोजन करण्यात आले होते. कोरोनाकाळामुळे हे गणित पूर्णपणे बिघडले. त्यामुळे नगरसेवकांमध्ये धास्ती आहे.

Web Title: Nagpur Standing Committee budget in vain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.