नागपुरात लागले ४० हजार एलईडी, मात्र ऊर्जा बचत किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:24 PM2018-12-17T12:24:09+5:302018-12-17T12:26:15+5:30

४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nagpur started 40 thousand LEDs, but how much energy was saved? | नागपुरात लागले ४० हजार एलईडी, मात्र ऊर्जा बचत किती?

नागपुरात लागले ४० हजार एलईडी, मात्र ऊर्जा बचत किती?

googlenewsNext
ठळक मुद्दे४७० कोटींचा प्रकल्पमनपाच्या विद्युत विभागाकडे माहिती नाही

गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेला पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी शहरात १ लाख ३८ हजार हजार एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षापूर्वी घेण्यात आला. यातील ४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या दाव्यानुसार ऊर्जा बचत होऊन वीज बिलात कपात अपेक्षित होती. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील पददिवे बदलवून एलईडी लावल्यास ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार आहे. ९९ महिन्यात एलईडी दिवे लावल्यानंतर पुढील ९ वर्षात प्रकल्पावरील संपूर्ण खर्चाची परतफेड होऊन ३५० कोटींची बचत होणार होईल, असा दावा विद्युत विभागाकडून केला जात आहे. त्यानुसार ४० हजार एलईडी लावल्यानंतर वीज बिलात ३५ ते ३६ टक्के कपात अपेक्षित होती. मात्र नेमकी किती बचत होत आहे याची आकडेवारी विभागाकडे नाही. वास्तविक ४७० कोटींचा हा प्रकल्प असून कंत्राटदारांना ५४ हप्त्यांत २७० कोटी द्यायचे आहेत. त्यामुळे प्रकल्प राबविताना ज्या भागात एलईडी लावण्यात आले अशा मार्गावरील पथदिव्यांचे आधी येणारे वीज बिल आताचे बिल याची माहिती तुलनात्मक माहिती अपेक्षित होती. विभागाकडे यासंदर्भात माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
डिसेंबर २०१८पर्यंत शहरात आणखी ९८ हजार एलईडी मे २०१९ पर्यंत लावण्यात येणार आहेत. यातून ७० टक्के वीज बचतीचा दावा करण्यात आला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत दिवे फिटिंगचे काम होणे अपेक्षित होते. मात्र एलईडी दिव्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट होते. यामुळे काम ठप्प होते.आता याचिका निकाली निघाल्याने उर्वरित दिवे लावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. एलईडी दिवे लावताना ५९ कोटींचा मूलभूत बळकटीकरणाचा प्रकल्पही सोबतच राबविला जाणार आहे. यात खांब उभारणे व केबल टाकण्याचे काम सोबतच केले जात आहे.

४७० कोटींचा प्रकल्प
महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता.या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध अडचणीमुळे प्रकल्प रखडला. ४०हजार एलईडी लावण्यात आले. आणखी ९८ हजार एलईडी लावण्याचे शिल्लक आहे. कामाची गती विचारात घेता मे २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, याची शाश्वती नाही.

झोननिहाय कंत्राट तरीही विलंब
२०१४ मध्ये जे. के. सोल्युशन इंक कंपनीला निर्धारित कालावधीत एलईडी दिवे बसविण्यात अपयश आल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. या कंपनीचा अनुभव विचारात घेता झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. त्यानंतरही कामात अद्याप गती आलेली नाही.

Web Title: Nagpur started 40 thousand LEDs, but how much energy was saved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.