नागपुरात नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:13 AM2018-05-08T00:13:48+5:302018-05-08T00:13:59+5:30
पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नदीकाठावरील वस्त्यांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये तसेच नदीपात्रातील गाळ व कचरा काढण्यासाठी महापालिकेतर्फे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेंतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ७ मे ते २० जूनदरम्यान शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोरा नदीपात्रातील गाळ व कचरा काढला जाणार आहे. सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नदीकाठावरील वस्त्यांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये तसेच नदीपात्रातील गाळ व कचरा काढण्यासाठी महापालिकेतर्फे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेंतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ७ मे ते २० जूनदरम्यान शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोरा नदीपात्रातील गाळ व कचरा काढला जाणार आहे. सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
नाग नदी स्वच्छता अभियान
नाग नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ नंदनवन येथील केडीके महाविद्यालयाजवळील नदीपात्रात झाला. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, माजी महापौर प्रवीण दटके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, स्थायी समितीचे माजी सभापती बाल्या बोरकर, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, विधी समितीचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, आरोग्य सभापती मनोज चापले, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
पोरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सहकारनगर घाटाजवळील पोरा नदीपात्रात महापौरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त वीरेंद्र सिंह, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहेते, नगरसेवक संदीप गवई, किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, अॅड. मीनाक्षी तेलगोटे, वनिता दांडेकर, पल्लवी शामकुळे, लता काडगाये यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पिवळी नदी स्वच्छता अभियान
जुना कामठी रोड नाका, कळमना वस्ती येथून पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आमदार अनिल सोले यांच्या हस्ते करण्यात आला. एक जेसीबी, एक पोकलँड, एक टिप्पर यांच्या साह्याने आणि २५ कर्मचारी मनुष्यबळाद्वारे पिवळी नदी स्वच्छतेचे कार्य होणार आहे. यावेळी सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
१५ टप्प्यात अभियानाची विभागणी
नदी स्वच्छता अभियानाची महापालिकेने १५ टप्प्यात आखणी केली आहे. प्रत्येक टप्प्याचा प्रमुख अधिकारी नेमण्यात आलेला आहे. मागील वर्षी तिन्ही नदी मिळून सुमारे ७२ हजार टन माती आणि गाळ काढण्यात आला होता. यावर्षीही यापेक्षा जास्त गाळ व माती काढण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, ओसीडब्ल्यू, नागपूर मेट्रो रेल्वे, डब्ल्यूसीएल व नासुप्र यांच्याकडून यंत्रसामुग्री महापालिकेला उपलब्ध करण्यात आली आहे. नदीतून निघणारा गाळ व माती भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात येणार आहे. नदीतून निघणारा गाळ व माती तिथेच साचू न देता लगेच त्याची विल्हेवाट करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
स्वच्छता अभियान कार्यक्रमाला प्रतोद दिव्या धुरडे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक हरीश डिकोंडवार, राजेश घोडपागे, भारती बुंडे, मनीषा कोठे, मनीषा धावडे, वंदना भगत, समिता चकोले, उज्ज्वला शर्मा, माजी अतिरिक्त आयुक्त व एनईएसएलचे संचालक डॉ.आर.झेड.सिद्दीकी, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग)महेश धामेचा, मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता सी.जी.धकाते, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, उपअभियंता (नदी, सरोवर व प्रकल्प) मोहम्मद इजराईल, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव, ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसूरकर, सर्पमित्र विश्वजित उके, रामसागर डंभारे, विशाल डंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.