Nagpur: रेल्वेत मोबाईल चोरला, दुसऱ्यांदा सावज शोधायला आला आणि पकडला गेला

By नरेश डोंगरे | Published: March 22, 2024 09:29 PM2024-03-22T21:29:52+5:302024-03-22T21:30:44+5:30

Nagpur News: प्रवाशांच्या माैल्यवान चिजवस्तू आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या अमरावतीच्या एका चोरट्याला नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद केले. शेख हारूल शेख मोहम्मद (वय ५२) असे आरोपीचे नाव असून तो अमरावतीच्या यासमिन नगरात राहतो.

Nagpur: Stolen mobile phone in train, second time came to find Savaj and got caught | Nagpur: रेल्वेत मोबाईल चोरला, दुसऱ्यांदा सावज शोधायला आला आणि पकडला गेला

Nagpur: रेल्वेत मोबाईल चोरला, दुसऱ्यांदा सावज शोधायला आला आणि पकडला गेला

- नरेश डोंगरे 
नागपूर - प्रवाशांच्या माैल्यवान चिजवस्तू आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या अमरावतीच्या एका चोरट्याला नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद केले. शेख हारूल शेख मोहम्मद (वय ५२) असे आरोपीचे नाव असून तो अमरावतीच्या यासमिन नगरात राहतो.

संधी मिळताच रेल्वेतील प्रवाशांच्या माैल्यवान चिजवस्तू आणि रोख रक्कम लंपास करण्यात सराईत असलेल्या हारूल याने १६ मार्चला ट्रेन नंबर १२१९४ जबलपूर यशवंतपूरम सुपर फास्ट एक्सप्रेसच्या मागच्या जनरल डब्यातून एका प्रवाशाचा मोबाईल चोरला होता. सहाव्या दिवशी २१ मार्चला तो पुन्हा बिलासपूर एक्सप्रेसच्या मागच्या डब्यात सावज शोधू लागला. ही गाडी गुरुवारी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर थांबली. येथे प्रवाशांच्या साहित्याची सुरक्षा करण्यासाठी 'ऑपरेशन अमानत' अंतर्गत कर्तव्यावर असलेले आरपीएफचे पीएसआय एच. एल. मिना, हवलदार नीरजकुमार, धिरज दलाल, दीपा कैथवास आणि जीआरपीचे अमित त्रिवेदी, अमोल हिंगणे तसेच प्रवीण खवसे यांना हारूलचा संशय आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे आरपीएफच्या ठाण्यात आणून त्याला बाजीराव दाखविण्यात आला. यानंतर हारूलने १६ मार्चला जबलपूर यशवंतपूरम रेल्वेगाडीत मोबाईल चोरल्याची कबुली दिली. आज पुन्हा तो सावज शोधत होता, हेदेखिल सांगितले. त्यावरून त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
रेल्वे पोलिसांनी आरोपी शेख हारूलला अटक केली. त्याचे एकूणच वर्तन बघता तो सराईत चोरटा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. त्याच्याकडून यापूर्वीचे गुन्हे उघडकीस येण्याचीही शक्यता पोलिसाणना वाटते. त्यामुळे त्याने यापूर्वी कोणकोणते गुन्हे केले, त्याची चाैकशी केली जात आहे.

Web Title: Nagpur: Stolen mobile phone in train, second time came to find Savaj and got caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.