नागपुरात बसेसवर दगडफेक, हलबा समाजाचे आंदोलन चिघळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:28 PM2018-11-19T22:28:26+5:302018-11-19T22:33:12+5:30
हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहिली घटना सोमवारी दुपारी १२.३५ वाजता घडली. बस क्रमांक एमएच/३१/एफसी/०४२४ चे चालक अरविंद खुडे आणि कंडक्टर सुभाष नारनवरे हे खरबी टी-पॉर्इंटवरून परत जयताळा बस पॉर्इंटकडे परत जात होते. गंगाबाई घाटसमोर बस थांबली. प्रवासी खाली उतरत असतानाच दोन बाईकवर आलेले चार युवक बससमोर उभे झाले. त्यातील एकाने बॅट काढून बससमोरील काचेवर जोरात प्रहार केला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराने विट फेकून मारली. काचा फोडल्यानंतर हलबा समाजाला न्याय द्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्य करा, अशी मागणी करणारे पॉम्प्लेट बसमध्ये टाकून ते युवक फरार झाले. तीन युवकांनी चेहºयावर कापड बांधलले होते तर एका युवकाचा चेहरा उघडा होता. बसची काच फोडल्यानंतर बसचे जवळपास ३५ हजार रुपयाचे नुकसान झाले. चालक बस घेऊन थेट कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचला. चालक खुडे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना लकडगंज परिसरातील महावीर चौकात दुपारी १.३० वाजता घडली. चालक पंढरी साम्रतवार बस क्रमांक एमएच/४०/एफसी/०९४० ने प्रवासी घेऊन जात होते. त्यांच्या बससमोर बाईकवर आलेल्या सहा युवकांनी बॅट आणि दगड मारून बसच्या समोरची काच फोडली. त्याचवेळी आझमशहा चौकातही तिसरी बस क्रमांक एमएच ४०/बीजी/१०८१ च्याही काचा अज्ञात युवकांनी फोडल्या. त्यांचीही सारखीच मागणी होती.