नागपूरपारा २१ अंशावर, सरासरीपेक्षा ७.८ ने उसळी; ढगांनी पळविली थंडी

By निशांत वानखेडे | Published: December 3, 2024 06:55 PM2024-12-03T18:55:06+5:302024-12-03T18:56:52+5:30

Nagpur : पुन्हा तीन दिवस स्वेटर दूर

Nagpur temperature at 21 degrees, 7.8 above average; Cloud driven cold | नागपूरपारा २१ अंशावर, सरासरीपेक्षा ७.८ ने उसळी; ढगांनी पळविली थंडी

Nagpur temperature at 21 degrees, 7.8 above average; Cloud driven cold

निशांत वानखेडे

नागपूर : गेल्या चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने थंडीला पार दूर केले आहे. रात्रीच्या तापमानात मंगळवारी ३ अंशाने वाढ झाली व ते २१.४ अंशावर उसळले आहे, जे सरासरीपेक्षा तब्बल ७.८ अंशाने अधिक आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या अंगावरचे स्वेटर दूर झाले आहे. दिवसा पारा सरासरीत असल्याने थाेड्या प्रमाणात गारव्याची जाणीव हाेत आहे.

फेंगल चक्रीवादळ पुडूचेरीमध्ये शांत झाले असताना कर्नाटक किणारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जाे मंगळवारी मध्य अरब सागरात सरकला आहे. यासाेबत तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन पुढच्या दाेन दिवसात मध्य पूर्व अरबी समुद्रात तयार हाेण्याचा अंदाज आहे. या प्रभावाने विदर्भासह महाराष्ट्रात पुन्हा तीन दिवस ढगाळ वातावरण राहून उसळलेले तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानाने चांगलीच उसळली घेतली आहे. नागपूरशिवाय अकाेल्यात सर्वाधिक २२ अंश किमान तापमानाची नाेंद झाली आहे. चंद्रपूरचा पारा सर्वात कमी १७ अंशावर आहे. गाेंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम २० अंशाच्यावर आणि अमरावती, भंडारा १९ अंशावर आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणाची ही स्थिती पुढचे तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण राहून वाढलेले तापमान कायम राहील, असा अंदाज आहे. ७ डिसेंबरनंतर ढगांची गर्दी हटून पुन्हा थंडीचा तडाखा वाढेल, अशी शक्यता आहे.

Web Title: Nagpur temperature at 21 degrees, 7.8 above average; Cloud driven cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.