नागपुरात २४ तासांत तापमान ५ अंशाने घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 10:42 AM2021-01-23T10:42:18+5:302021-01-23T10:44:59+5:30
Nagpur News temperature आकाशातील ढगांचे अच्छादन दिसेनासे हाेत वातावरण काेरडे हाेताच, २४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकाशातील ढगांचे अच्छादन दिसेनासे हाेत वातावरण काेरडे हाेताच, २४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण झाली. शहरात ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. अचानक तापमानात घट झाल्याने व पारा सामान्यपेक्षा ३ अंशाने खाली घसरल्याने नागरिकांना पुन्हा हुडहुडीचा अनुभव येऊ लागला आहे. दरम्यान, तापमानात च-उतार हाेत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २५ जानेवारीनंतर आकाशात पुन्हा ढग दाटून येण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामान विभागानुसार उत्तर-पूर्व बांगलादेश आणि पाकिस्तानात साइक्लोनिक सर्कुलेशन तयार हाेत आहे. याचा थेट प्रभाव मध्य भारतावर पडणार आहे. हवा ३.६ किमी प्रती तासाच्या गतीने वाहत आहे. यामुळेही वातावरण स्वच्छ झाले आहे. दरम्यान, विदर्भात ९.६ अंश तापमानासह गाेंदिया सर्वाधिक थंड जिल्हा ठरला.
नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ४५ टक्के हाेती, जी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४१ टक्के नाेंदविण्यात आली. आर्द्रता घटल्याने थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. २५ ते २८ जानेवारीदरम्यान आकाशात ढग दाटले जाणार असल्याने धुके पडण्यासारखी स्थिती दिसून येणार आहे. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात रात्रीच्या तापमानात घट नाेंदविण्यात आली.