नागपुरात २४ तासात तापमानात १०.७ अंशाने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:42 PM2021-03-24T23:42:43+5:302021-03-24T23:43:46+5:30
temperature, nagpur news पावसामुळे मंगळवारी शहरातील किमान तापमान ८.४ अंश सेल्सिसने खालावले होते. मात्र बुधवारी वातावरण निवळल्याने २४ तासात पुन्हा पारा १०.७ अंशाने वाढला आहे. बुधवारी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यत आली.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे मंगळवारी शहरातील किमान तापमान ८.४ अंश सेल्सिसने खालावले होते. मात्र बुधवारी वातावरण निवळल्याने २४ तासात पुन्हा पारा १०.७ अंशाने वाढला आहे. बुधवारी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यत आली.
सामान्यापेक्षा २ अंशाने तापमान कमी असल्याने उष्णतामान जाणवले नाही. मात्र आता वातावरण निवळत असल्याने तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. या महिन्याच्या अखेर पारा ४० अंशावर पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ढग निवळल्याने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यातील तापमानात बदल झाला आहे.