गडद धुके बनले रेल्वेसाठी स्पीड ब्रेकर, गाड्या रेंगाळल्या; वेळापत्रक विस्कळीत, रेल्वे वाहतुकीला जबर फटका

By नरेश डोंगरे | Published: January 15, 2024 11:28 PM2024-01-15T23:28:20+5:302024-01-15T23:28:39+5:30

Indian Railway:

Nagpur: The dark fog became a speed breaker for the railways, the trains crawled; Schedule disrupted, rail traffic severely affected | गडद धुके बनले रेल्वेसाठी स्पीड ब्रेकर, गाड्या रेंगाळल्या; वेळापत्रक विस्कळीत, रेल्वे वाहतुकीला जबर फटका

गडद धुके बनले रेल्वेसाठी स्पीड ब्रेकर, गाड्या रेंगाळल्या; वेळापत्रक विस्कळीत, रेल्वे वाहतुकीला जबर फटका

- नरेश डोंगरे 
नागपूर - उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट आल्याने सर्वत्र गडद धुके निर्माण झाले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुक प्रभावित झाली आहे. उत्तर भारतातून नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या स्पीडला धुक्यामुळे ब्रेक लागला असून रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून उत्तर भारतात गारठा निर्माण झाला असून वातावरणाने गडद धुक्याची शाल पांघरली आहे. त्यामुळे सोमवारी अनेक रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहोचल्या. उशिरा धावत असलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत.

१२५११ राप्तीसागर एक्स्प्रेस १६ तास उशिरा, १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेस १५ तास, १२६१६ जीटी एक्स्प्रेस १२ तास, २० मिनिट, १२६२६ केरला एक्स्प्रेस ११ तास, २०८०६ एपी एक्स्प्रेस, १२७२२ दक्षिण एक्स्प्रेस १० तास, १२७२३ तेलंगणा एक्स्प्रेस १० तास, २२५१२ कर्मभूमी एक्स्प्रेस ८.३० तास, २२४०४ पाँडेचरी सुपरफास्ट एक्स्प्रेस ८ तास, १२६२२ एक्स्प्रेस ७ तास, १२९५० सिकंदराबाद एक्स्प्रेस ६ तास, १८०३० शालिमार एलटीटी एक्स्प्रेस ४.३० तास, २२८४५ पुणे हटिया सुपर फास्ट एक्स्प्रेस ४.१० तास, १२८११ एलटीटी हावडा सुपर फास्ट एक्स्प्रेस ४ तास, १२८१० हावडा एलटीटी एक्स्प्रेस ४ तास, १२७२१ दक्षिण एक्स्प्रेस ३.२० तास, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ३ तास, १२१३० हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २.५० तास, ०२१३९ मुंबई नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस २.४० तास, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस २.४० तास, १८२३८ छत्तीसगड एक्स्प्रेस २.४५ तास, १२८६० गीतांजली एक्स्प्रेस २.१५ तास, १२९६८ सुपर फास्ट एक्स्प्रेस २ तास १० मिनटे उशिरा धावत आहे.

फलाट, प्रतीक्षालयात गर्दी वाढली
विविध गाड्या उशिरा धावत असल्याने या गाड्यांच्या प्रतीक्षेतील प्रवाशांची रेल्वे स्थानकावरच्या विविध फलाटांवर तसेच प्रतीक्षालयात गर्दी वाढली आहे. परिणामी खान-पानाच्या स्टॉलवरही झुंबड बघायला मिळत आहे.

Web Title: Nagpur: The dark fog became a speed breaker for the railways, the trains crawled; Schedule disrupted, rail traffic severely affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.