Nagpur: चक्क पार्किंगमधील ट्रक्सच्या टायर्सवर हात केले साफ, साडेसात लाखांचा माल लंपास
By योगेश पांडे | Updated: October 8, 2023 15:56 IST2023-10-08T15:56:10+5:302023-10-08T15:56:37+5:30
Nagpur: पार्किंगमध्ये ठेवलेल्या तीन ट्रक्सचे साडेसात लाख रुपयांचे टायर्स चोरट्यांनी लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Nagpur: चक्क पार्किंगमधील ट्रक्सच्या टायर्सवर हात केले साफ, साडेसात लाखांचा माल लंपास
- योगेश पांडे
नागपूर - पार्किंगमध्ये ठेवलेल्या तीन ट्रक्सचे साडेसात लाख रुपयांचे टायर्स चोरट्यांनी लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शिवनाथ मनबोधनसिंग परमार (४५,सुर्यनगर) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांच्या कंपनीतील वाहन चालकाने आऊटर रिंग रोड क्रमांक सातवर असलेल्या साईराम ढाब्याजवळ असलेल्या पार्किंग गोडावूनमध्ये काही ट्रक पार्क केले होते. रात्री अज्ञात चोरट्याने तेथे जाऊन तीन ट्रक्समधील एकूण तीस टायर गायब केले. त्यात एमएच ४० सीएम ९१२१ चे १५, एमएच ४० सीएम ८५२१ चे १३ व एमएच ४० सीएम ९०२१ च्या दोन टायर्सचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी ही बाब उघडकीस आल्यावर परमार यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.