नागपुरात ६२.७२ लाखाची वीजचोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:29 PM2018-10-13T23:29:22+5:302018-10-13T23:30:05+5:30

नवा नकाशा येथील मोरयानी भवनातील बर्फ आणि शीतपेयाच्या कंपनीत वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच, वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने ६२ लाख ७२ हजार ४०५ रुपयंचा दंड ठोठावला. वीजचोरी प्रकरणात शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे.

In Nagpur, theft of Rs. 62.72 lakhs electricity disclosed | नागपुरात ६२.७२ लाखाची वीजचोरी पकडली

नागपुरात ६२.७२ लाखाची वीजचोरी पकडली

Next
ठळक मुद्देएसएनडीएलची कारवाई : मोरयानी भवनातील बर्फ कंपनीवर ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवा नकाशा येथील मोरयानी भवनातील बर्फ आणि शीतपेयाच्या कंपनीत वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच, वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने ६२ लाख ७२ हजार ४०५ रुपयंचा दंड ठोठावला. वीजचोरी प्रकरणात शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे.
एसएनडीएलच्या चमूने वापरलेल्या विजेचे मूल्यांकन करून त्याच्या दंडाबाबतची प्रत मोरयानी परिवाराला दिली. परंतु त्यांनी ती प्रत स्वीकारली नाही. त्यामुळे एसएनडीएलने गुरुनानक प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या नावाने पोस्टाने असेसमेंटची प्रत पाठविली. यात असे म्हटले आहे की, एकूण ७४३९०० युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. यात १५ दिवसात पैसे न भरल्यास परिसरातील सर्व वीज कनेक्शन कापले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मोरयानी भवनाला वीजपुरवठा करणाऱ्या स्थानिक ट्रान्सफार्मरवर ८३ टक्के तोटा नोंदविण्यात येत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत असल्याचा संशय होता. पोलिसांच्या मदतीने एसएनडीएलच्या चमूने परिसरात धाड टाकली. मीटर रुमची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, मीटरला बायपास करून बर्फ बनवले जात आहे. फ्रीजिंग युनिटमध्ये जवळपास ५४ किलोवॅट लोड सापडला. बाहेरून बंद दिसणाºया या कारखन्यात गेल्या तीन वर्षांपासून वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले.

जळालेले वीज मीटरही बदलवू दिले नाही
सन २०१५ मध्ये या परिसराच्या मालकाने तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या परिसरातील इंडस्ट्रीयल मीटर जळाले आहे. परंतु जेव्हा चमू मीटर बदलविण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना आत प्रवेश करू देण्यात आला नाही. एसएनडीएल नियमितपणे नोटीस देऊन मीटर बदलविण्यास सांगत राहिले. परंतु मीटर बदलविले गेले नाही.

 

Web Title: In Nagpur, theft of Rs. 62.72 lakhs electricity disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.